बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. हिंदूंना मारहाण, अत्याचार, जाळपोळीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. हिंदूंचे संरक्षण आणि कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी युनुस सरकार हातावर-हात ठेवून शांत बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याच दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे, इतका काळ उलटूनही पोलिसांनी अद्याप तिचा शोध लावू शकलेले नाहीत. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक सुरक्षित असल्याचा ढोल युनुस सरकार वाजवत आहे. मात्र, वास्तव वेगळे असल्याचे दिसून येते.
तृष्णा राणी सरकार (१६) असे अपहरण करण्यात आलेल्या मुलीचे नाव असून ती गायबंधा जिल्ह्यातील पलाशबारी परिसरातील रहिवासी आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी कबीर हुसेन, शिहाब गोनी आणि साहिन मियाँ यांनी तिचे अपहरण केले होते. मुलीच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली. परंतु, आतापर्यंत पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. कुटुंबाने २४ जानेवारी रोजी पलाशबारी प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत ही संपूर्ण माहिती दिली.
कुटुंबाने हात जोडून सरकारकडे कारवाईची मागणी करत मुलीला शोधू काढण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, तक्रार दाखल करूनही अद्याप पोलिसांनी मुख्य आरोपी कबीर हुसेनला अटक केलेली नाही. तसेच अपहरण झालेल्या मुलीचा शोधही घेत नसल्याची माहिती आहे. तिच्या कुटुंबाला ती मृत आहे की जिवंत आहे हे माहित नाही.
हे ही वाचा :
सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातून सहा रॉकेट्स जप्त
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले
Hindu minor girl was abducted two months ago, but still the Police couldn't recover or find the girl.
Trishna Rani Sarkar(16) is a resident of the #Palashbari area of the #Gaibandha district.
On the 11th of November, 2024 she was abducted by Kabir Hossain, Shihab… pic.twitter.com/tDpbVojEld
— Hindu Voice (@HinduVoice_in) January 28, 2025