बीड जिल्ह्यातील चकलांबा गावात राहणाऱ्या एका गोरक्षकाला मुस्लीम तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जुन्या भांडणाचे कारण काढून तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली आहे. जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलीस स्टेशन चकलांबा येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरु आहे.
गोपाल मधुकर उणवणे असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मोलमजुरी करून कुंटुबाची उपजिवीका भागवतो. तसेच तो अखिल भारतीय गोसेवा संघात गोरक्षक म्हणून काम करतो. तक्रारीत त्याने म्हटले की, २७ जानेवारी रोजी रात्री ९.४० च्या सुमारास कलांबा गावातील पोलीसन स्टेशन कडे जात असताना गावातील रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबूब कादरी आणि इतर सहा ते सात जणांनी बस स्थानकाकडे नेले. यावेळी त्यांनी जुन्या भांडणाचे कारण काढून मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावर त्यांना जाब विचारल्यास असता रिहाण सय्यदने कानाखाली मारली व इतर लोकांनी मला लाथाबुक्याने मारहाण केली. मारहाणी दरम्यान रिहाण सय्यदने खाली पडलेला दगड उचलून डोळ्यावर मारहाण करत जखमी केले. यावेळी माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकुन पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आले. पोलीस येताना पाहताच हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेवून घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी हल्लेखोरांनी जाताना पुन्हा भेटला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली.
हे ही वाचा :
बांगलादेशात १६ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पोलिसांकडून दुर्लक्ष!
राहुल गांधीचा अरविंद केजरीवालांवर निशाणा
सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
मारहाणीत जखमी झाल्यामुळे पोलिसांनी तरुणाला चकलांबा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर तरुणाने हल्लेखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबूब कादरीसह इतर सात जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.