29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामा'ओएलएक्स' वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे

‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे

पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

जुन्या वस्तू विकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओएलएक्स’ या ऑनलाइन अँपवर फसवणूक करणाऱ्या टोळीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. या टोळीविरुद्ध मुंबईसह देशभरात शेकडो गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्वसुख खुट्टा रुजदार उर्फ समशु (३७), तुलशीराम मीणा (२५), अजित पोस्वाल (१९) आणि इर्शाद सरदार (२४) असे अटक करण्यात आलेल्या चौकडीचे नावे आहे. हे चौघे राजस्थान राज्यातील भरतपूर येथे राहणारे आहेत. ओएलएक्स या ऑनलाइन वेबसाईटवर ही टोळी लक्ष ठेवून असायची, या वेबसाईटवर विक्री साठी असणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचा नावाखाली तर कधी लष्करी जवान बनून या टोळीतील सदस्य जुन्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांची लाखोंची फसवणूक करीत होती.

मुंबईत राहणाऱ्या एका व्यवसायिकाने काही आठवड्यापूर्वी ओएलएक्स या वेबसाईटवर घराचे फर्निचर विक्रीसाठी ठेवले होते. या दरम्यान या टोळीने या व्यवसायिकाशी संपर्क साधून फर्निचर विकत घेण्याचे भासवून त्याच्या व्हाट्सअप्प वर एक क्यू आर कोड पाठवला, व तो क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले. व्यवसायिकाने क्यू आर कोड स्कॅन केला असता या व्यवसायिकाच्या बँक खात्यातून ९ हजार रुपये वजा झाले. हे ९ हजार रुपये परत करण्यासाठी वेगवेगळे लिंक पाठवून या व्यवसायिकाच्या बँक खात्यातून १७ लाख ८२ हजार रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यवसायिकाने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून राजस्थान पोलिसांच्या मदतीने या चौघांना अटक केली.पोलिसांनी या टोळीजवळून दोन लाख रुपये रोकड, ९ मोबाईल फोन, ३२ विविध बँकांचे डेबिट कार्ड,  ४विविध कंपन्यांचे मोबाईल सिम कार्ड, बँकेचे चेकबुक, एका फायनान्स कंपनीचे चेकबुक जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन आणि सिम कार्ड मध्ये ८३५ विविध मोबाईल क्रमांक मिळून आले हे मोबाईल क्रमांक एनसीसीआरपी वर आलेल्या तक्रारीशी मिळतेजुळते आहे.

हे ही वाचा:

सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले

राहुल गांधी नोटाबंदीविरोधातील मोहिमेबद्दल माफी मागणार का?

छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग

काय पंचकर्म, काय योगासनं, शहाजी बापू पाटलांच वजन एकदम ओक्के

या टोळीवर मुंबईत १० गुन्हे राज्यात १४ गुन्हे दाखल असून देशभरात शेकडो गुन्हे दाखल आहे. या टोळीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा