29.4 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित संशयितांवर छापे; १०० हून अधिक जण ताब्यात

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित संशयितांवर छापे; १०० हून अधिक जण ताब्यात

महाराष्ट्र एटीएसची मोठी धडक कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभरात मोठी समन्वित कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगरा गँगशी कथित संबंध असलेल्या संशयितांच्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत आतापर्यंत १०० हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या व्यापक कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगावसह विविध शहरांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. भारतात उभारण्यात आलेले पाकिस्तानी गुन्हेगारी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींचा पाकिस्तानातील गुन्हेगारी संघटनांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक तपासात पाकिस्तानी गँगस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः बेरोजगार युवकांना आलिशान जीवनशैली, मोठ्या पैशांचे आमिष आणि परदेशातील संधी दाखवून त्यांना गुन्हेगारी जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. एटीएसच्या मते, या कारवाईचा मुख्य उद्देश संभाव्य स्लीपर सेल, गुन्हेगारी नेटवर्क आणि पाकिस्तानशी संबंधित संशयितांचे जाळे उद्ध्वस्त करणे हा आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून गुन्हेगारी कट, शस्त्रांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर कारवाया केल्या जात असल्याचा तपास यंत्रणांचा संशय असून त्याच अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात आली.

छापेमारीदरम्यान एटीएसने संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्हसह विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. याशिवाय संबंधितांच्या बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि निधीच्या स्रोतांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या नेटवर्कला पाकिस्तान किंवा इतर परदेशी स्रोतांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.

कोण आहे शहजाद भट्टी?

शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. ४५ वर्षीय भट्टीवर भारतात दहशतवादी नेटवर्क उभारणे, हेरगिरीशी संबंधित कारवाया आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तो सध्या दुबईतून आपले नेटवर्क चालवत असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानसह आशियातील विविध देशांमध्ये त्याचा नियमित वावर असल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे.

हे ही वाचा:

ऑस्ट्रेलियन माध्यमांवर ‘मिस्टर इंडिया’ पंतप्रधान मोदींची छाप

देशभरात मान्सूनचा कहर; १० जणांचा मृत्यू

निदा खानला जामीन देताना श्रीकृष्णाचा उल्लेख, पण गुन्हा गंभीरच

ट्रम्प यांच्या हत्येचा कट? इस्रायलने अमेरिकेला दिला गुप्तचर अहवाल

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, मार्च २०२४ मध्ये जालंधर येथे युट्युबर रॉजर संधू यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याशीही शहजाद भट्टीचे नाव जोडले गेले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार झीशान अख्तरला भारताबाहेर पळून जाण्यास मदत केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा