33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरक्राईमनामासिद्धू मुसेवालेच्या मारेकऱ्यांसह चार गुंडांना यमसदनी पाठवले

सिद्धू मुसेवालेच्या मारेकऱ्यांसह चार गुंडांना यमसदनी पाठवले

Google News Follow

Related

पंजाबच्या चंदीगड येथे अटारी सीमेवरील एका गावात गुंडांशी पोलिसांच्या झालेल्या चकमकीत चार शूटर्स ठार झाले आहेत. त्यात सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील दोन गुंडांचा समावेश आहे. अमृतसरपासून साडेतेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अटारी येथील शेतात हे गुंड लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आणि गुंडांमध्ये जवळपास सहा तास चकमक सुरू होती. चकमकीत मुसेवालाचा मारेकरी जगरूप उर्फ ​​रूपा  तसेच मनप्रीत उर्फ ​​मन्नू ठार झाले. या चकमकीत तीन पोलीस आणि तीन नागरिकही जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी ही चकमक झाली ते भारत-पाकिस्तान सीमेवरील गाव आहे.

चार शूटर्सची खात्मा : अटारीच्या आमदाराचा दावा….
आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार जसविंदर रामदास यांनी पोलिस आणि गुंडांमधील ही चकमक संपल्याचा दावा केला आहे. यामध्ये ४ गुंड ठार झाले आहेत. ज्या इमारती मध्ये गुंड लपले होते ती इमारत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र पोलिसांकडून अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंचा विश्वास पंतप्रधानांनी वाढविला!

तडकाफडकी राजीनामा देणे ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक!

अडीच वर्षांनंतर प्रगती एक्स्प्रेस धावणार नव्या रुपात!

“भारताच्या कोविड विरुद्धच्या लढ्याचा भावी पिढ्यांना अभिमान वाटेल”

 

गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यावर जगरूप उर्फ रूपा आणि मनप्रीत उर्फ मन्नू याना पंजाब पोलिसांनी अटारी सीमेजवळील गावात घेरले. मन्नू हा तोच व्यक्ती आहे ज्याने मूसेवालावर एके-47 ने गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी गोळीबार केला असता पलीकडून प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. गुंडांकडे प्राणघातक शस्त्रे असल्याचेही समजल्यानंतर अमृतसरहून मोठ्या संख्येने पोलीस दल भकना गावात पोहोचले. शेवटी झालेल्या चकमकीत या गुंडांना पोलिसांनी अचूक वेध घेत त्यांना ठार मारले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा