राजधानी भोपाळमधील एमपी नगर परिसरात लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर ‘जस्सू’ नाव घेऊन स्वतःला हिंदू दर्शवणाऱ्या मुस्लिम तरुणाने एका हिंदू मुलीशी मैत्री केली आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नाव सोहेल असून तो मूळचा पिपरिया (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याने सोशल मीडियावर ‘जस्सू’ नावाने फेक प्रोफाइल तयार करून भोपाळमधील एका हिंदू मुलीशी ओळख वाढवली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि सोहेलने तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले.
दोघंही एमपी नगरमधील एका खासगी हॉटेलमध्ये पोहोचले. मात्र, या गोष्टीची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन तरुणाला मुलीसोबत पकडले.
हे ही वाचा :
शांतता, ट्रम्पना नोबेल नाही… व्हेनेझुएलाच्या मच्याडोंची निवड
शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना न्यायालयाची तंबी
… म्हणून इस्लामाबादकडे जाणारे रस्ते कंटेनरने केले बंद
प्रथम तरुणाने आपलं नाव ‘जस्सू’ असल्याचा दावा केला, पण ओळखपत्र तपासल्यानंतर त्याचं खरे नाव ‘सोहेल’ असल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तिथेच गोंधळ घातला आणि आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच एमपी नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि सोहेलला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, मुलीचे जबाब नोंदवले जात आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.







