गोवंशाचे मांस नेणाऱ्यांविरोधात कारवाई होत असली तरी गेवराई येथे मात्र गोवंशाचे मांस नेणाऱ्यांना रोखणाऱ्यांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. उमापूर येथे इब्राहिम रज्जाक (५५) आणि त्याचा मुलगा आयान इब्राहिम कुरेशी (१८) हे गोवंशाचे जवळपास ६५ किलो मांस नेत असल्याचे आढळले होते. त्याची माहिती हिंदू आघाडी दलाचे कार्यकर्ते सोमनाथ गाडे, गोपाळ उनवणे, संग्राम ढोले पाटील, कृष्णा पोपळघट यांना कळली. त्यांनी या दोघांना रोखले आणि त्यांच्याकडे गोवंशाचे मांस सापडले. या दोघांना चकलांबा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे सदर दोन इसमांकडे ६५ किलोचे गोमांस आणि दुचाकी असा ३६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.
पण यात इब्राहिम कुरेशीने पोलिसांना माहिती देत याच हिंदू आघाडी दलाच्या लोकांना आपल्यावर गज, कोयता, काठीने मारहाण केल्याचा आरोप केला. इब्राहिम आणि आयान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चकलांबा पोलिस ठाण्यात कैलास औटी, गोपाळ उनवणे, संग्राम ढोले, कृष्णा पोपळघट, संग्राम गाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा:
जितेश शर्माच्या रापचिक खेळीने लखनऊचा धुव्वा!
पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…
“डिनो मोरिया ही मातोश्रीची सून”
आज संपूर्ण जगाला ‘सिंदूर’ या शब्दाचा अर्थ आणि त्याचे महत्व समजले
यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे हे कारवाई करत आहेत. इब्राहिम आणि आयान यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत असा सवाल उपस्थित केला जात आहे की, जर गोरक्षकांनाच असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असेल तर गोरक्षणाच्या कामासाठी कोण पुढे येणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घालावे आणि गोरक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
