प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ केवळ हिंदू नाही, तर जगभरातील लोकांसाठी उत्कंठेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीसह जगभरातील भाविक या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. एकूण ४५ कोटी लोक त्रिवेणी संगमात स्नान करतील अशी अपेक्षा आहे. हा हिंदू श्रद्धेचा महाकुंभ आहे, हिंदू शक्तीचा महाकुंभ आहे. जेव्हा हिंदू एकवटतात तेव्हा काँग्रेसच्या गटार गंगेत गटांगळ्या खाणाऱ्या किड्यामकोड्यांचा पोटशूळ उठतो. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी महाकुंभामुळे महामारी पसरेल असे विधान केले आहे. देशात काही पिढ्यांपूर्वी तलवारीच्या बळावर बाटलेले बाटगे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांबाबत का बोलतात ते कळायला मार्ग नाही. त्यांनी आधी खतना, हलालातून बाहेर पडावे. तीही एक मोठ्या प्रमाणात पसरलेली महामारी आहे. कुंभ मेळा व्यवस्थित पार पडेल हे पाहण्यासाठी हिंदू सक्षम आहेत.
रामलला प्राणप्रतिष्ठेच्या नावाने बोटं मोडणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी आता कुंभाला लक्ष करण्याचा धंदा सुरू केला आहे. हुसेन दलवाई हे काँग्रेसमध्ये काडीमात्र महत्व नसलेले नेते. यांच्या पाठीशी चार माणसं नाही. घरात सुद्धा यांना किंमत
असेल अशी शक्यता नाही. त्यामुळे रिकामपणाचे उद्योग म्हणून ते सल्ले देण्याचे काम करतात. परंतु हे सल्ले त्यांनी त्यांच्या पंक्चर आणि भंगारचा व्यवसाय करणाऱ्या भाईबंदाना द्यावे. कुंभमेळ्याची दखल जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असा गौरव करत जगाने घेतलेली आहे. आंतराराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर असलेला नासाचा खगोलशास्त्रज्ञ डोनाल्ड पेटीट याने कुंभमेळ्याचा फोटो शेअर केलेला आहे. हिंदूंचे धर्मशास्त्र आणि खगोलाचा किती गहीरा संबंध आहे, हे नासाच्या तज्ज्ञांना चांगलेच ठाऊक आहे. २१ व्या शतकातही पृथ्वी चपटी आहे, हा समज उराशी बाळगून जगणाऱ्यांना त्याचे कौतुक कशाला असणार.
पाकिस्तानसारखे शेजारी देश भारतात घातपात घडवण्याची संधी शोधत असताना कुंभमेळ्यासारखा महासोहळा शांततेने पार पडतो आहे. हिंदू जातीपातीच्या भिंती पाडून या सोहळ्यात सहभागी होतोय. सनातन धर्माला मानणारे, बाटवा बाटवीमुळे आपल्या पूर्वजांनी धर्म बदलला यावर ठाम विश्वास असलेले अनेक मुस्लीम आणि ख्रिस्ती बांधवही गंगेत डुबकी मारायला येत आहेत. त्यांना गंगेच्या पावित्र्यावर संशय नाही, ना महामारीची भीती. स्वच्छतेचे धडे दलवाई यांनी त्या मशीद आणि दर्ग्यात जाऊन देण्याची गरज आहे, जिथे एकाच तुंबलेल्या पाण्यात कित्येक लोक वजूसाठी हातपाय धूत असतात आणि तिथेच चुळा मारत असतात. मुस्लीमांमध्ये असलेल्या खतना, हलालासारख्या प्रथांवर दलवाईंसारखे लोक तोंडात मळी भरल्यासारखे गप्प राहतात. त्यांना हिंदूंच्या धार्मिक आस्थांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. जर मुस्लीम हिंदूंच्या आस्थांबाबत बोलू शकतात. तर तुमच्या धार्मिक आस्थांबाबत बोलण्याचा अधिकार हिंदूंनाही असू दे. परंतु तो देण्याची तुमची तयारी नाही. हिंदू जेव्हा उच्चारवाने त्याबाबत बोलतील तेव्हा तुम्हाला कानात बोटे घालावी लागतील.
नुपूर शर्माने ते सिद्ध केलेले आहे. त्यामुळे उगाच भानगडीत पडू नका.
हे ही वाचा:
सैफ हल्ला प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक!
छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा ‘लेझीम’ प्रकार मोठा नाही!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक सुधा मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांनी केलेले आहे. त्यांच्या तुलनेत दलवाई खूपच खुजे आहेत. १० हजार स्वच्छता सेवक, १८०० गंगासेवक, रुग्णांसाठी ६००० बेड्स, ४६
हॉस्पिटल, एअर एम्ब्यूलन्स अशी जय्यत व्यवस्था करण्यात आलेली आहे. सिलिंडर स्फोटाने लागलेली आग अवघ्या ३० मिनिटात आटोक्यात आणण्या इतपत सतर्क असलेली अग्निशमन यंत्रणा इथे कार्यरत आहे. ज्या हज यात्रेचे दलवाई तोंड भरून कौतुक करीत आहेत, तिथे चेंगराचेंगरीच्या घटना किती झाल्या, त्यात किती लोक अल्लाला प्यारे झाले, याची आकडेवारी उपलब्ध आहे. परंतु दलवाई यांच्यासारखे सुशिक्षित मूर्ख त्याबाबत बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत.
आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला, अशी दलवाईंची अवस्था आहे. काँग्रेस नेत्यांना हिंदूंच्या धर्मश्रद्धांबाबत तोंडाला हगवण लागल्याप्रमाणे बोलायची सवय आहे. अशी काही तरी बडबड केली तर सोनिया मॅडमचे आपल्याकडे लक्ष जाईल आणि खासदारकीचा तुकडा पदरात पडेल याच्यासाठी प्रयत्न चाललेले असतात. हिंदू समाजाने अशा मुखंडाना चोख उत्तर देण्याची गरज आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)