27.2 C
Mumbai
Wednesday, September 14, 2022
घरसंपादकीयविरोधक वाढवतायत मुख्यमंत्र्यांचे वजन

विरोधक वाढवतायत मुख्यमंत्र्यांचे वजन

शिंदेंची अतिसक्रियता विरोधकांना अस्वस्थ करू लागली आहे.

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर ४ जुलै रोजी विधिमंडळात विश्वास व्यक्त करण्यात आला. सरकार स्थापन होऊन नुकतेच कुठे दोन महिने उलटले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या टीकेचे लक्ष्य फक्त आणि फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस होते. परंतु गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांचे एकमेव टार्गेट बनले आहेत.

गेल्या काही दिवसात भाजपाविरोधकांची विधाने तपासली तर एकनाथ शिंदे हेच त्यांच्या रडारवर आहेत हे स्पष्ट होते. परंतु विरोधकांनी टीका करावी आणि शिंदे यांच्या उत्तरामुळे त्याचे बुमरँग व्हावे असे चित्र वारंवार दिसते आहे. दिल्लीतील लघुशंकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या देवदर्शनावर आक्षेप घेतला आहे. महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तिने देवदर्शनासाठी किती वेळ घालवायचा याला मर्यादा आहेत, असे दादा म्हणालेत. ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकृतीला साजेशी आहे.

त्यांच्या टीकेनंतर अनेकांना शरद पवारांनी दगडू शेठ गणपती मंदिराला दिलेली भेट, आणि दर्शन न घेता परतलेले पवार आठवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाचे देवादिकांशी वाकडे आहे. थोरले पवार मांसाहार करून आले म्हणून त्यांनी दगडूशेठ मंदिरातील दर्शन टाळले. त्यांच्या मांसाहार प्रेमी कन्या सुप्रिया सुळे तर त्यांच्या चार पाऊलं पुढे आहेत. संकष्टीच्या दिवशीही निसंकोचपणे मांसाहार करतात आणि तो किती गोड होता हे लोकांना अभिमानाने सांगतात. त्यामुळे ज्यांना देवधर्माशी काही घेणे देणे नाही, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या देवधर्मावर आक्षेप घेणे स्वाभाविकच आहे. पंरतु देव दर्शन हे केवळ निमित्त आहे. शिंदेंची अतिसक्रियता विरोधकांना अस्वस्थ करू लागली आहे.

सुप्रिया सुळे या देखील मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनाबद्दल बोलल्या. टीव्हीवर बघावं तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरी दर्शन घेत असतात. मंत्र्यांकडे वेळ मागितला तर तो मिळत नाही. बहुधा तेही आरत्यांमध्ये बिझी असतात. मुख्यमंत्री दर्शनाला जाताना कॅमेरामन घेऊन जातात असाही सुप्रिया सुळे यांचा आक्षेप आहे. हल्ली कॅमेराची गरज नसते हे त्यांना कळायला हवं. १४ फेब्रुवारी २०१७ ला संकष्टीच्या दिवशी त्यांनी येवल्यातील अंबिका खानावळीत मटण खाऊन ट्विटरवर फोटो टाकले होते. ते कुठे कॅमेराने काढले होते? मोबाईल हाती असला की काम होते आज काल.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांना छाप्यात सापडलेल्या सोने, चांदीमुळे डोळे दिपले

एअर इंडियाच्या विमानातून निघाला धूर

मैत्रिणीने आत्महत्या केल्याचे कळल्यावर तिनेही स्वतःला झोकून दिले

प्रभादेवीचा सिद्धीविनायक इथे प्रकटला

 

राष्ट्रवादीवाल्यांना मुख्यमंत्र्यांच्या दर्शनावर आक्षेप आहे, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री पदावर राहीलेल्या आदित्य ठाकरे यांना त्यांच्या फिरण्यावर. मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसून काम करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री असताना घरातून क्वचित बाहेर पडले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रालयातही क्वचित पाय ठेवला. कधी मंत्रालयात आलेच तर दिवसभर थांबलेत, लोकांना भेटलेत असंही झालं नाही. त्यांच्या चेंबरमध्ये लोक जाऊ नयेत, त्यांच्या भोवती गर्दी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. मुख्यमंत्री घरी बसूनही काम करतायत असे चित्र निर्माण करण्यासाठी पीआरवर प्रचंड पैसा खर्च केला जायचा.

हे सगळ फार जुनं नाही. परंतु आदित्य यांना त्याचा विसर पडलेला दिसतोय. ते आता एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसून काम करण्याचे सल्ले देतायत. स्वत: आदित्य ठाकरे मंत्रालयात किती वेळा गेले, पालक मंत्री म्हणून उपनगर जिल्ह्यात त्यांना किती वेळा प्रवास केला ही संशोधनाची बाब आहे. त्यांच्या वरळी मतदार संघात तर मतदार त्यांना शोधून थकले असे चित्र होते.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे सध्या पायाला भिंगरी लावून राज्यात फिरतायत. ते गणेशोत्सवाच्या काळातही फिरले त्यात नवले ते काय? पण या दोन महिन्यांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने किती महत्वाचे निर्णय घेतले हे कसे काय नजरेआड करता येईल?

शिंदे यांचा धडाका एवढा आहे की, त्यांनी विरोधकांची झोप उडवली आहे हेच खरे. पैठणच्या सभेत त्यांनी चौकार षटकार मारले. आम्ही अशा ठिकाणीच जातो जिथे कॅमेरे घेऊन जाता येतात. अशी टोलेबाजी त्यांनी केली. त्यांचा रोख अर्थात आदित्य ठाकरे यांच्याकडे होता.

हा मुख्यमंत्री ऐकणारा नाही. ऐकवणारा आहे. शोलेमध्ये एक जबरा डायलॉग आहे. गब्बर सिंग तुम हमारा एक आदमी मारोगे तो हम तुम्हारे चार आदमी मारेंगे. शिंदे सध्या शोलेतल्या जय-वीरुची भूमिका एकत्र पार पाडतायत. दोन दोन मुख्यमंत्री या सुळे यांच्या टिकेवर त्यांनी दिलेले उत्तर भारी आहे. ते तुमच्या काळात होतं, एक घरी बसलेला मुख्यमंत्री एक काम करणारा. शिंदे यांच्या फटकेबाजीने सर्वांना अवाक केले आहे. ते ऐकतच नाहीत. व्याजासह परतफेड करतात. अजितदादा सकाळी सहापासून लोकांना भेटतात, यावर शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेले उत्तर कमाल आहे. मी पहाटे सहा पर्यंत लोकांना भेटत असतो असे ते म्हणाले.

हे मुख्यमंत्री झाल्यानंतर घडलेले नाही. शिंदे राज्यात नगरविकास मंत्री असतानाही हेच चित्र होते. रात्री अडीच वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांना फोन करून कामाचा फिडबॅक घेणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जातकुळी एकच आहे. घरी बसून कारभार करणारे नेते त्यांच्याशी स्पर्धा करण्याची शक्यता कमीच आहे. सतत लोकांमध्ये राहणे हे त्यांचे शक्तिस्थान आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सिल्लोड, पैठण, छत्रपती श्री संभाजीनगर येथे सभा घेतल्या. गजानन कीर्तिकर, मनोहर जोशी, मिलिंद नार्वेकर यांच्या घरीही ते जाऊन आले. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या वाढदिवसानिमित्त ते कांदिवलीपर्यंत आले होते. त्यांची ही अविरत काम करण्याची शक्ती विरोधकांची अडचण बनली आहे. शिंदेंचे वजन वाढू लागले आहे. महाविकास आघाडीला फक्त देवेंद्र फडणवीस आवरत नव्हते, आता तर शिंदेंची भर पडली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,949चाहतेआवड दर्शवा
1,935अनुयायीअनुकरण करा
35,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा