29.3 C
Mumbai
Thursday, May 14, 2026
घरदेश दुनियाचीन दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प, पण स्वागताला शी जिनपिंग नाहीत

चीन दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प, पण स्वागताला शी जिनपिंग नाहीत

विमानतळावर उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांनी केले स्वागत

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी चीनमध्ये पोहोचले असताना त्यांच्या स्वागतावरून मोठी चर्चा रंगली आहे. बीजिंग विमानतळावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग स्वतः उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या ऐवजी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात याकडे मोठ्या प्रतीकात्मक संदेशाच्या रूपात पाहिले जात आहे.

ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलसारख्या देशांचे दौरे केले होते. त्या सर्व देशांमध्ये संबंधित राष्ट्रप्रमुख विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे स्वागत करताना दिसले होते. मात्र चीनमध्ये तसे झाले नाही. त्यामुळे सोशल मीडियावरही “ट्रम्प यांचा अपमान” अशी चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा:
भायखळा गोळीबार प्रकरण उघड

मंत्र्यांच्या ताफ्यात कपात, विदेश दौऱ्यांवर निर्बंध; फडणवीस यांची काटकसरीची भूमिका

चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजार हिरव्या निशाणावर

मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!

बीजिंग विमानतळावर ट्रम्प यांच्यासाठी मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. चीनच्या सैन्याच्या बँडसह सुमारे ३०० युवक-युवती अमेरिकन आणि चिनी ध्वज घेऊन उपस्थित होते. लाल गालिच्याचे स्वागतही करण्यात आले. मात्र शी जिनपिंग गैरहजर राहिल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले.

दरम्यान, चीनच्या प्रोटोकॉलनुसार राष्ट्राध्यक्ष नेहमी प्रत्येक परदेशी नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर जात नाहीत, असे सांगितले जात आहे. २०१७ मध्ये ट्रम्प चीन दौऱ्यावर गेले होते, त्यावेळीही त्यांचे स्वागत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच केले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या भेटीदरम्यानही शी जिनपिंग विमानतळावर गेले नव्हते.

या दौऱ्याला जागतिक राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार, टॅरिफ, कृत्रिम बुद्धिमत्ता, तैवान प्रश्न आणि रेअर अर्थ मिनरल्स यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेतील अनेक मोठे उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारीही बीजिंगमध्ये पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे चीनकडे रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे खुलेपणाने कौतुक केले होते. त्यांनी “चीनने अमेरिकन कंपन्यांसाठी अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात” अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यामुळे जिनपिंग विमानतळावर गैरहजर राहिल्याने त्याचा राजकीय अर्थ लावला जात आहे. अमेरिका-चीन संबंध सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहेत. तैवान प्रश्न, इराण युद्ध, व्यापार संघर्ष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती स्पर्धा या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा