29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरधर्म संस्कृतीसंजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत; महाविकास आघाडीचे हेच धोरण आहे का?

संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत; महाविकास आघाडीचे हेच धोरण आहे का?

Related

भाजपा आमदार नितेश राणे यांचा सवाल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंनी रझा अकादमीच्या ईफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. त्यावरून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी संजय पांडेंसोबत महाविकास आघाडीलाही धारेवर धरले आहे. रझा अकादमीला महाविकास आघाडी प्रोत्साहित करत आहे का? असा सवाल राणेंनी विचारला आहे. की रझा अकादमीला प्रोत्साहित करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आहे का? असाही सवाल त्यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी संजय पांडे यांचा रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीचा फोटो ट्विटरवर शेअर करत मविआवर टीका केली आहे. “ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवानची मुर्ती तोडली आणि महिला पोलिसांशी गैरवर्तन करून त्यांच्यावर हात उचलला, अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?” असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

येणाऱ्या अधिवेशनात ठाकरे सरकारला रझा अकादमीबद्दल विचारणा करणार असल्याचे राणे म्हणाले आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारने सांगितले होते की, रझा अकादमीचे सर्व पुरावे तपासात आहोत आणि लवकरच पुरावे तपासून रझा अकादमीवर बंदी घालू असे म्हंटले होते. मात्र आता ज्यांच्यावर आपल्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच दहशवादी, देशद्रोहिंना भेटत आहेत.

हे ही वाचा:

नवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

‘संपकाळात गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही’

पुढे राणे म्हणाले, रझा अकादमीने आझाद मैदानावरच्या अमर जवान स्तंभाची मोडतोड केली. त्यानंतर महिला पोलिसांवरही हात उचलला होता. रझा अकादमीने सतत देशाविरोधी, भारताविरोधी भूमिका घेतली आहे. ह्या रझा अकादमीने भिवंडी मोर्चाच्या नंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना मारले होते. नुकतंच नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये दंगल भडकवण्यामागे पुढाकार घेतला. त्या मोर्चांमध्येपण त्यांनी मोठ्या प्रमाणावर अत्याचार केला आणि याच रझा अकादमीला मुंबई पोलीस आयुक्त भेटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा