काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ३९ लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न उपस्थित करत सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावले. मात्र अशी मतदारांची संख्या केवळ २०२४ याच वर्षी वाढलेली नाही तर यापूर्वीही अशा पद्धतीने निवडणुकीपूर्वी मतदारांची संख्या वाढलेली आहे.
राहुल गांधी यांनी दावा केला होता की, महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यांच्यादरम्यानच्या ५ महिन्यात ३९ लाख मतदार वाढले. ही संख्या कशी वाढली, या सगळ्या मतदारांचे फोटो, नावे, त्यांचे पत्ते आम्हाला द्या अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. त्याशिवाय, २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख आणि विधानसभा निवडणुकीआधी ३९ लाख असे ७० लाख मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता.
हे ही वाचा:
फडणवीस राहुलना म्हणाले, एकही चुटकुला बार बार सुनाया…
चेंबूर माहुल गाव येथून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक!
मनोरुग्णाच्या हल्ल्यात पोलीस अंमलदार जखमी, सेल्फी पॉईंटवरील घटना!
मात्र मतदारांची संख्या वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ ते २०१९ या दोन विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान तब्बल ६३ लाख मतदार वाढले होते. तर २००९ आणि २०१४ या दोन विधानसभांच्या दरम्यान ७५ लाख मतदार वाढले होते. २००९मध्ये तर काँग्रेसचेच सरकार महाराष्ट्रात होते.
ही मतदारांची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे तेवढ्या प्रमाणात पात्र मतदारांची होणारी नोंदणी.
महाराष्ट्रातील हे आकडे असे-
विधानसभा नोव्हेंबर २०२४ – ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९
लोकसभा जून २०२४ – ९ कोटी ३० लाख ६१ हजार ७६०
वाढ – ३९ लाख ६३ हजारर ३५९
विधानसभा ऑक्टोबर २०१९ – ८ कोटी ९८ लाख ३८ हजार २६७
लोकसभा मे २०१९ – ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६
वाढ – ११ लाख ६१ हजार ३२१
विधानसभा ऑक्टोबर २०१४ – ८ कोटी ३५ लाख २८ हजार ३१०
लोकसभा मे २०१४ – ८ कोटी ०७ लाख ९८ हजार ८२३
वाढ – २७ लाख २९ हजार ४८७
विधानसभा ऑक्टोबर २००९ – ७ कोटी ५९ लाख ६८ हजार ३१२
लोकसभा मे २००९ – ७ कोटी २९ लाख ५४ हजार ०५८
वाढ – ३० लाख १४ हजार २५४