मराठी वाड्.मय परिषद बडोद्याचे ७४वे अधिवेशन ८ आणि ९ फेब्रुवारीला होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते डॉ. उदय निरगुडकर आहेत.
महाराणी चिमणाबाई हायस्कूर सलाटवाडा, बडोदे येथे हे संमेलन होणार असून शनिवारी पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन गुजरात विधानसभेचे मुख्य दंडक बाळकृष्ण शुक्ल यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी वडोदरा महानगर सेवासदनच्या महापौर पिंकीबेन सोनी या असतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली आशुतोष मराठे करणार आहेत. रात्री ८.३० वाजता डॉ. आशीष मुजुमदार यांचे गझल आख्यान (आयुष्य समृद्ध करणारा काव्यानुभव) असेल.
९ फेब्रुवारीला माध्यमे आणि साहित्य या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. निरगुडकर असतील तर या परिसंवादात सुज्ञा संजय रेळेकर, संदीप कदम, कृष्ण भावे, चंद्रशेखर अग्निहोत्री यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन डॉ. चैती साळुंके करतील. हा परिसंवाद सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
हे ही वाचा:
२००९, २०१४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढले होते ७५ लाख मतदार
१५ कोटी रुपये ऑफर केल्याच्या दाव्यानंतर एसीबीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी
अमेरिकेत ४ लाख कमावण्यापायी ५० लाख गमावले!
दुपारी ४ वाजता युवा संमेलन होणार असून डॉ. निरगुडकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. १४ ते ३० वयोगटातील मुले हा संवाद साधतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली भाटे करणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता साहित्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि संमेलनाचा समारोप होणार आहे.
रात्री ८.३० वाजता भावसंगीताच्या कार्यक्रमाचा सर्वांना आस्वाद घेता येईल. तरी असेल गीत हे या कार्यक्रमाचे सादरीकरण डॉ. मृदुला दाढे करणार आहेत. साथसंगत नरेंद्र सकटे (की बोर्ड), तबला ऋषिराज साळवी देतील.
या वाड्.मय परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बोडस आहेत तर कार्यवाह चेतन पावसकर व संजय बच्छाव आहेत तर कोषाध्यक्ष शशांक केमकर आहेत.