बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने एक नवा अध्यादेश जारी करून बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यासह ४०० हून अधिक व्यक्तींचा ‘स्वातंत्र्यसैनिक’ (बीर मुक्तिजोद्धा) दर्जा रद्द केला आहे.नव्या आदेशानुसार, या व्यक्तींना आता “मुक्तिसंग्रामाचे सहकारी” असे संबोधले जाईल – थेट युद्धात सहभागी स्वातंत्र्यसैनिक नव्हे. या नव्या कायद्यानुसार ‘स्वातंत्र्यसैनिक’ची व्याख्या बदलण्यात आली असून, केवळ त्यांनीच या श्रेणीत समाविष्ट व्हावे, जे १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष युद्ध लढले.
- जुनी व्यवस्था – नवीन व्यवस्था १९७१ च्या मुक्तिसंग्रामात भारतात राहून, जनमत तयार करणारे, राज्यघटना समितीचे सदस्य, अधिकारी, पत्रकार, कलाकार यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ मानले जात होते.
- नवी व्यवस्था. – आता फक्त २६ मार्च ते १६ डिसेंबर १९७१ दरम्यान प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्यांनाच ‘स्वातंत्र्यसैनिक’ मानले जाईल. बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे नाव ‘स्वातंत्र्यसैनिक’ यादीत होते.आता त्यांच्या नावाचा उल्लेख पूर्णपणे हटवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
माइंडफुलनेस : आनंदी राहण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग, जाणून घ्या फायदे
अर्द्धहलासनाचे आरोग्यदायी फायदे : तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी!
क्रुणाल पांड्याचा ऐतिहासिक पराक्रम
बांगलादेशच्या नव्या नोटांवर ‘या’ हिंदू मंदिराची प्रतिमा!
नवीन अध्यादेशात काय बदलले गेले आहे?
-
अफसान चौधुरी (मुक्तिसंग्राम संशोधक) यांनी हा निर्णय “नोकरशाहीचा निर्णय” असल्याचे सांगितले.
-
त्यांनी म्हटले: “प्रत्येक सरकार नवीन आले की, नवी यादी तयार होते – यात वैयक्तिक स्वार्थ असतो. पण लोकांच्या मनात मुक्तिसंग्राम कायम आहे आणि राहील.”
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार अस्तित्वात आल्यापासून शेख मुजीबूर रेहमान यांचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न होत आहे. जेव्हा बांगलादेशात विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले तेव्हा मुजीबूर रेहमान यांचा पुतळा पाडण्यात आला होता. शिवाय, त्यांच्या चलनी नोटांवरील त्यांचे चित्रही हटविण्याचा निर्णय झाला.
