28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणपहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे!

पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे!

Google News Follow

Related

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून आज अडीचशे दिवस लोटले तरी त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी का केलेली नाही? परमबीर यांना होमगार्ड महासंचालक पदावरून हटविण्याची कारवाई राज्य सरकार का करत नाही, असा सवाल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे गेले काही महिने गायब होते. अखेर ते पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांची आता पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने जे गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल केले आहेत. त्यासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे असल्याचा आरोप आमदार भातखळकर यांनी केला आहे.

आमदार भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, परमबीर यांच्यासंदर्भात केंद्र सरकारची मदत का राज्य सरकारने मागितली नाही. परमबीर यांच्याविरोधात इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, मग त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? कदाचित यामागील कारण असेल की, त्या अनिलवर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिलवर आरोप नको, म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करत नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप…असे शिवसेनेने नाटक चालविले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हायला हवी, अशी आग्रही मागणीही आमदार भातखळकर यांनी केली आहे.

 

हे ही वाचा:

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

एक लस असेल तर एक पेग

 

परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली असा आरोप काँग्रेसने केला होता, पण ते इतके दिवस भारतातच होते. मुख्य म्हणजे जिथे काँग्रेसची सत्ता आहे, त्या चंदीगडमध्येच होते. ज्या पक्षासोबत सत्तेत आहोत, तोच पक्ष परमबीर सिंग यांना वाचवत होता हे माहीत असतानाही एकही शब्द त्यांच्याविरोधात काढायचा नाही. मात्र दुसरीकडे मोदी सरकारवर द्वेषातून खोटे आरोप करायचे, हा काँग्रेसचा ढोंगीपणाही यातून उघड झाला आहे, अशेही भातखळकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा