33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारण‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’

‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडले परिवारवादावर टीकास्त्र

एका संकटाच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे, जी राज्यघटनेला वाहिलेल्या लोकांसाठी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि ती म्हणजे कौटुंबिक पक्ष. राजकीय पक्ष आपापले लोकशाही चारित्र्य गमावून बसतात तेव्हा राज्यघटनेची भावना दुखावली जाते. प्रत्येक घटकही दुखावला जातो. ज्या पक्षांनी आपले लोकशाही चारित्र्य गमावले आहे ते लोकशाहीचे रक्षण कसे करणार? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.

पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली यापुढे बोलण्याची गरज नाही. काश्मीर ते कन्याकुमारीच्या राजकीय पक्षांकडे पाहा त्यांच्याकडे लोकशाही भावना दिसत नाही. कौटुंबिक राजकीय पक्ष म्हणजे एका कुटुंबातील अनेक लोक राजकारणात येऊ नये असे नाही, पण गुणवत्तेच्या जोरावर राजकारणात यावं. कित्येक पिढ्यांपासून राजकीय पक्ष एक कुटुंब चालवतात, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता काँग्रेसवर केली आहे.

संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२६ नोव्हेंबर) देशाला संबोधून भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या महान नेत्यांना अभिवादन केले. त्यानंतर मोदी यांनी २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा:

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

एक लस असेल तर एक पेग

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’

भारताच्या विद्वानांनी अनेक महिने देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी मंथन केले होते त्यानंतर संविधान रूपातील अमृत आपल्याला मिळाले आहे. आज आपल्याला संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर, काय झालं असतं? स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचे दु:ख हे सर्व एकत्र असूनही त्यावेळी देशहित हेच सर्वोच्च मानल गेलं. विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होते. आज त्याकडे पाहिलं तर संविधानाचे एक पानही आपण लिहू शकलो असतो का? त्यावेळी राष्ट्र सर्वात पहिले असं होते परंतु, आता काळानुसार राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे कधी कधी देशहित मागे पडतं आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

संविधान तयार करणाऱ्यांचेही स्वत:चे काही विचार असतील, त्यांची विचारधारा असेल आणि त्याला धारही असेल. पण तरीही त्यांनी राष्ट्रहित सर्वोच्च मानून संविधान लिहिले ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असेही मोदी म्हणाले. संविधान दिन साजरा व्हायला हवा कारण आपली वाटचाल योग्य आहे की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी हा दिन साजरा व्हायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा