30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणशिवसेनेचा हा आमदार भाजपात जाणार?

शिवसेनेचा हा आमदार भाजपात जाणार?

Google News Follow

Related

राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, अशी खंत व्यक्त करुन दाखवणारे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतिश पाटील यांनी केला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सतिश पाटील रविवारी जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.

यावेळी सतिश पाटील यांनी चिमणराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. २०१४ च्या विधानसभेत आपला पराभव घडवून आणण्यात आला, असे चिमणराव पाटील म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा सवाल सतिश पाटील यांनी चिमणराव पाटलांना विचारला.

हे ही वाचा:

दोन दिवसीय अधिवेशनातही विरोधक ठाकरे सरकारला घेरणार?

अखेर शिक्षकांवर बसप्रवास करण्याची मेहेरबानी

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आगरी सेनेचा एल्गार

झोमॅटोचा आता ‘शेअर्स’चा ऑप्शन

राज्यात महाविकास आघाडी असल्याने शासकीय समित्या नियुक्तीत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे असे आदेश आहेत. परंतु, आमदार चिमणराव पाटील एरंडोल, पारोळा मतदार संघात हा नियम पाळत नाहीत. त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोय, अशी व्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती, असेही सतिश पाटील यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा