महायुती 2.0 च्या पहील्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. गेल्या काही वर्षांच्या परंपरेचे पालन करत विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर बहीष्कार टाकला. विरोधी पक्षाकडे कोणतीही नवी रणनीती नाही. जुनी बाटली, जुनी दारु. सत्ताधारी पक्षातील विसंवादावर ते जास्त अवलंबून आहेत. मविआतील विसंवादामुळे जसे त्यांचे सरकार कोसळले तसे महायुतीतील कथित विसंवादामुळे विद्यमान सरकार कोसळेल, असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह काल रविवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेत एक है तो सेफ है… हेच चित्र दिसल्यामुळे तुर्तास तरी विरोधकांच्या अपेक्षेवर पाणी पडलेले दिसते आहे.