ऑपरेशन सिंदूरबाबत फेसबुकवर हलकट टीपणी करणाऱा हरीयाणातील अशोका युनिवर्सिटीचा प्राध्यापक अली खान महमुदाबाद याला अटक करण्यात आली. याची मुळं पाकिस्तानात आहेत. त्यामुळे त्याची पाठराखण करण्यासाठी काँग्रेस नेते सरसावणे स्वाभाविकच नाही का? जिथे जिथे पाकिस्तानचा संबंध असतो तिथे ओणवे होण्यासाठी काँग्रेस नेते सज्जच असतात. काँग्रेस प्रवक्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत अकलेचे तारे तोडले. मोदी सरकारला धारेवर धरले. अली खान आणि काँग्रेसमध्ये अनेक साम्य स्थळे आहेत. दोघांचा संबंध पाकिस्तानच्या निर्मितीशी आहे. दोघांचे पाकिस्तानवर उदंड प्रेम आहे. हे प्रेम खानदानी आहे. बापजाद्यांपासूनचे आहे.
