वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षांच्या आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्यामुळे राजीनामा देणार नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु त्यांना जावे लागेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत