इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पाडाव केला. भारतीय महिलांचे आक्रमण इतके जोरदार होते कि त्यापुढे बांगलादेशाचा सहज पाडाव होणार हे लक्षात आल्याने प्रेक्षकांनी सुरवातीपासूनच ढोल ताशांचा नगारा वाजवणे सुरु होते.
भारताची कर्णधार प्रियांका इंगळेने सरसेनापतीची भूमिका बजावत एक-एक खेळाडू बाद करताना जरासुद्धा दयामाया दाखवली नाही. तिला प्रमुख सरदाराच्या भूमिकेतील रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिल्याने बांगलादेशला माघारीची संधी सुद्धा न देता सरळ सरळ मोठा पराभव केला.
भारतासाठी हा विजय खूप मोलाचा होता. यापुढे अजून दोन लढती असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवण्यासाठी भारतीय छावणीत जोरदार तयारी केली होती आणि ती पूर्ण करण्यात सरसेनापती प्रियांका इंगळेने जरासुद्धा कसूर केली नाही.
हे ही वाचा:
बांगलादेशी, रोहींग्याना अनधिकृत जन्मतारखेचे दाखले, सोमय्यानी केली तक्रार!
परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी फडणवीस जाणार दावोसला
लोकशाहीचे गद्दार कोण ? झुक्या की फुक्या ?
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा पास्टर अटकेत!
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने ५० गुणांची आघाडी घेतली. तर संरक्षणात ६ ड्रीम रन मिळवत मध्यंतराला ५६-०८ अशी मोठी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा १०९-१६ असा ९३ गुणांनी धुव्वा उडवत खो-खो विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याचा आढावा:
दुसऱ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेशमा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल ५ मिनिटे ३६ सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये ६ गुण जोडले.
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेशमा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर १०६-८ असा होता.
शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. भारतीय संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना १०९-१६ अशा निर्णायक फरकाने जिंकला.
सामन्यातील पुरस्कार:
सामन्याचा सर्वोत्तम आक्रमक: मागाई माझी (बांगलादेश)
सामन्याचा सर्वोत्तम बचावपटू: ऋतुराणी सेन (भारत)
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: अश्विनी शिंदे (भारत)