बी-२ स्टेल्थ बॉम्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की इराणच्या आण्विक आस्थापनांचा आम्ही निकाल लावला. यापुढे इराण अण्वस्त्र बनवणार नाही. हा दावा करण्याचे धाडस तर इस्त्रायल सुद्धा करत नाही. ते फक्त असे म्हणतायत की, आम्ही इराणचा अणु कार्यक्रम दोन-तीन वर्षे मागे ढकलला. अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीला तर वर्षांचा हिशोबही मान्य नाही. त्यांचे तर म्हणणे आहे, की अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम फक्त काही महीने मागे सरकला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा गोपनीय अमेरिकी माध्यमांनी चव्हाट्यावर आणलेला आहे. बी-२ बॉम्बरचा हल्ला अगदीच वाया गेला असे दावा या अहवालाचा हवाला देऊन ही माध्यमे करीत आहेत. माध्यमांनी तिंबून काढल्यामुळे ट्रम्प भैसाटले आहेत. जे काही घडतंय ते भारताच्या पथ्यावर पडणारे आहे.
