भूतबाधेच्या संशयावरून एका दाम्पत्याने मोलकरीणच्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला वेताच्या काठीने मारहाण करून चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पश्चिम येथे उघडकीस आला आहे.
या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या मुलाला परळच्या वाडीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी या दाम्पत्यावर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा आणि मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघाना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
उद्धवजी, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत!
शुभांशूचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत-पाक युद्धात मीच केली मध्यस्थी!
वैभव कोकरे (३५)आणि हर्षदा (३२) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्यांचे नाव आहे. हे दाम्पत्य भांडुप पश्चिम जंगलमंगल रोड येथे राहण्यास आहे. हे दाम्पत्य घराजवळ बिसलेरी पाण्याच्या व्यवसाय करतात.
हे ही वाचा:
उद्धवजी, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत!
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
शिक्षणमंत्री दादा भुसे – राज ठाकरे भेटीत तोडगा नाही; मनसेचा ६ जुलैला मोर्चा
“भोंगे मुक्त मुंबई”, मशिदींवरील १५०० भोंगे उतरवले!
या दाम्पत्याकडे मागील काही आठवड्यापासून ३७ वर्षीय महिला ही मोलकरीणचे काम करीत होती. ही मोलकरीण आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन या दाम्पत्यांच्या घरकाम करण्यासाठी येत होती. तिचा मुलगा सतत रडत असल्यामुळे त्याला भूतबाधा झाली असे सांगून या दाम्पत्याने मुलाची भूतबाधा काढण्यासाठी त्याला वेताच्या काठीने मारहाण केली. तसेच जळत्या काडीपेटीने त्याच्या अंगावर चटके दिले जात होते. हा प्रकार मागील चार ते पाच दिवसापासून सुरू होता.
या दाम्पत्याने अडीच वर्षाच्या मुलांसह मोलकरीण हिच्यावर देखील जादूटोणा भुतबाधेच्या नावाने अत्याचार करीत होते. अखेर या घटनेची माहिती भांडुप पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाची आणि मुलाच्या आईची सुटका करून या दाम्पत्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर मुलाला उपचारासाठी वाडिया रुगणालयात दाखल करून मुलाच्या आईचा जबाब नोंदवून कोकरे दाम्पत्या विरुद्ध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा आणि मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघाना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने ३० जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
