भारताचे शुभांशु शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दाखल झाल्यानंतर तिथल्या चालक दलाने त्यांचे उत्साहात स्वागत केले. या वेळी एक्सिओम-4 मोहिमेच्या कमांडर पैगी व्हिटसन यांचेही मनापासून स्वागत करण्यात आले.
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर तिघे, स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ अंतराळयानामार्फत, गुरुवारी सायंकाळी अंतराळ प्रयोगशाळेशी जोडले गेले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या प्रवेश केला. हे डॉकिंग भारतीय वेळेनुसार दुपारी ४:०१ वाजता झाले, जेव्हा अंतराळ स्थानक उत्तर अटलांटिक महासागरावरून जात होते.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एका निवेदनात सांगितले की, गुरुवारी सकाळी ६:३१ वाजता (भारतीय वेळेनुसार सायं. ४:०१ वाजता), एक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान हे चौथ्या खासगी अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले.
हे ही वाचा:
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ७ जुलैला होणाऱ्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
व्हॉट्सऍप ग्रुुपमध्ये जोडला गेला, १ कोटी गमावून बसला!
अंतराळ स्थानकाशी जोडण्याआधी शुभांशु शुक्ला यांनी अंतराळातून एक संदेश पाठवला. त्यांनी सांगितले, अंतराळात पोहोचून सर्वांना नमस्कार! निर्वातात तरंगण्याचा अनुभव विलक्षण होता. माझ्यासाठी हा प्रवास एका लहान मुलासारखे सर्व काही नव्याने शिकण्यासारखे आहे.”
व्हिडीओ लिंकद्वारे पाठवलेल्या संदेशात त्यांनी असेही सांगितले की, लॉन्चच्या वेळी गुरुत्वाकर्षणाचा जबरदस्त अनुभव आला. असं वाटलं जसं आपल्याला खुर्चीवर मागे जोरात ढकललं जातंय.
पुढच्या क्षणी अचानक सगळं शांत झालं. काहीच वाटत नव्हतं आणि आपण फक्त तरंगत होतो. बेल्ट काढून आम्ही निर्वातात तरंगत होतो. सुरुवातीला काही क्षण अडचणीचे वाटले, पण लगेचच ते एक अद्भुत अनुभव ठरले.”
डॉकिंग यशस्वी
नासाच्या थेट प्रसारणात (Live Video) अंतराळयान स्थानकाजवळ येताना दाखवण्यात आले आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ४:१५ वाजता डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली.
यानंतर अंतराळयान आणि ISS यांच्यात संवाद व ऊर्जा संपर्क प्रस्थापित करण्यात आला. सुमारे संध्याकाळी ६ वाजता अंतराळ स्थानकाचे दरवाजे (हॅच) उघडले आणि सगळे अंतराळवीर स्थानकाच्या आत गेले.
