हिंदी भाषा सक्तीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत याला विरोध केला. याविरोधात दोनही नेत्यांकडून मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. या मोर्चात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
हिंदी भाषेवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत, यावरून उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होत आहे. असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला असता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझं उद्धवजींना एवढंच सांगणं आहे. मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगले होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचे नाही. कारण हिंदी सक्ती नाहीच. मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे.
दरम्यान, हिंदी भाषेवरून राज ठाकरे ६ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. तर उद्धव ठाकरे ७ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट करावे की आमच्या राज्यात हिंदी भाषा लागू केली जाणार नाही.
हे ही वाचा :
सरकार विरोधी मुद्दा नसल्याने भाषेच्या मुद्द्यावर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न!
आयटीआय विद्यार्थिनींसाठीही ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ योजनेचा लाभ द्या!
मुंबई आयआयटी कोणाच्या रडारवर? घुसखोरी की घातपात?
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ७ जुलैला होणाऱ्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये तीन भाषा नाहीत, देशात संघराज्य व्यवस्था आहे. प्रत्येकाची एक भाषा आहे, मग तीन भाषांची काय गरज आहे. मी परवाच सांगितले होते. मराठी लोकांना लढायला लावण्याचे काम सुरू आहे. ७ जुलै रोजी मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन होईल. शिवसेना त्यात सहभागी होईल. २९ जून रोजी मुंबईत हिंदी भाषाविरोधी आंदोलनाची बैठक होईल.
