वर्षा हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान. यानिवासस्थानाने अनेक मुख्यमंत्री येता-जाताना पाहीले आहेत. इथल्यालॉनमध्ये रेड्याचे मंतरलेले शिंग पुरले असल्याची खळबळजनकमाहीती, उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी उघडकेलेली आहे. इतकी वर्षे राजकारणात काढल्यानंतरही संजय राऊत अजून शोधपत्रकाराच्या भूमिकेतूनबाहेर पडलेले नाहीत. एका बाजूला पक्ष प्रमुख सांगतात की मला शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नाही. दुसऱ्या बाजूला प्रवक्ते तंत्र-मंत्राची भाषा करतात. बऱ्याच काळात नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची चर्चा होते आहे.