लाहोर येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक सामन्यात चक्क अफगाणिस्तानने इंग्लंडला ८ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. या विजयासह अफगाणिस्तानच्या खात्यात २ गुण जमा आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या खात्यात प्रत्येकी ३ गुण आहेत. पहिल्या गटात भारत आणि न्यूझीलंड प्रत्येकी ४ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
अफगाणिस्तानने केलेल्या ३२५ धावांना उत्तर देताना इंग्लंडचा डाव ३१७ धावात आटोपला. अखेरच्या दोन चेंडुंवर ९ धावा हव्या असताना इंग्लंडचा रशीद बाद झाला आणि अफगाणिस्तनाने ही रोमहर्षक लढत जिंकली. अफगाणिस्तनाच्या अझमतूल्ला ओमरझाई याने ५ विकेट्स घेत इंग्लंडला रोखले. मात्र त्याआधी इब्राहिम झदरान हा १७७ धावा करणारा खेळाडू अफगाणिस्तनासाठी हिरो ठरला. त्याच्या या जिगरबाज खेळीमुळे अफगाणिस्तनाने ३२५ धावांचा टप्पा गाठला. तोच सामन्यात सर्वोत्तम ठरला.
झदरानला साथ लाभली ती कर्णधार शाहिदी आणि मोहम्मद नबी यांची. दोघांनी ४० धावा करत उपयुक्त योगदान दिले.
हे ही वाचा:
गुजरातच्या अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याची सुटका
हिरे व्यापाऱ्याच्या मुलानेच मारला वडिलांच्या ऑफिसमध्ये ३कोटींचा डल्ला
शशी थरूर म्हणाले, महादेवाच्या भाळावरील चंद्रकोरीवरून ‘शशी’ नाव ठेवले!
वैभव गोळे ज्युनियर मुंबई श्रीचा विजेता
मात्र अफगाणिस्तनाच्या या धावांना उत्तर देताना इंग्लंडला ३१७ धावांचा टप्पा गाठता आला. इंग्लंडच्या जो रूटने १२० धावांची खेळी केली पण त्याला इतर फलदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. बेन डकेट (३८),कर्णधार जोस बटलर (३८), जॅमी ओव्हर्टन (३२) यांचे प्रयत्न तोकडे पडले.
या विजयानंतर दुसऱ्या गटात चांगली चुरस निर्माण झाली आहे. चार संघाच्या या गटात इनग्लंडला अद्याप खाते उघडता आलेले नाही. त्यांनी दोन सामने गमावले आहेत. आता अफगाणिस्तनाचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. २८ फेब्रुवारीला ही लढत होईल. जर अफगाणिस्तनाने लढत जिंकली तर ते उपांत्य फेरीत जातील.