28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषवर्षभरात एसटीच्या २३ कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

वर्षभरात एसटीच्या २३ कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

Related

राज्यामध्ये एसटीची अवस्था ही अतिशय बिकट झालेली असून, कमी वेतन व आर्थिक समस्यांमुळे एसटी कर्मचारी चांगलाच हवालदिल झालेला आहे. राज्यामध्ये कोरोना कालखंडामध्ये म्हणजेच मार्च २०२० पासून ते आत्तापर्यंत २३ एसटी कर्मचाऱ्यानी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यामध्ये १३ चालक असून, वाहक तसेच इतर विभागातील कर्मचारी आहेत. टाळेबंदीनंतर एसटी कर्मचारी कोलमडला. एसटीच्या उत्पन्नावरही टाळेबंदीचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. शिवाय एसटीचे वेतनही वेळेवर नसल्यामुळे, एसटी कर्मचारी  वैतागले आहेत.

महाराष्ट्रामध्ये सद्य़स्थितीमध्ये महामंडळाची अवस्था ही दयनीय झालेली आहे. महामंडळाला सरकामधून कुणी वाली आहे का असा प्रश्न आता एसटी कर्मचारी वर्गाला पडलेला आहे. दिवसागणिक एसटी कर्मचारी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढू लागलेले आहे. तुटपुंज्या पगारावर घर कसे चालवायचे हा प्रश्न तर आहेच. पण तोही पगार वेळेत न मिळाल्याने अनेकांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

नुकतीच राज्यामध्ये धुळ्यात एका एसटी चालकाने आत्महत्या केली होती. वेतन वितरणास विलंब झाल्याबद्दल महामंडळाला दोष देत एक चिठ्ठी मागे ठेवली होती. त्यानंतर एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांना कोणतेही कठोर पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “बस महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे आणि आम्ही दरमहा पगार देण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्याच्या घडीला महामंडळाचे एकूण नुकसान ७५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

हे ही वाचा:

मेहबुबांची मुफ्तीफळे; म्हणे आर्यन मुस्लिम असल्याने होतेय कारवाई

‘अमलीपदार्थांच्या संकटाशी लढण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध’

‘लाख’मोलाची खोखोपटू

अमिताभ बच्चन यांनी पान मसाल्याची जाहिरात का नाकारली?

 

मार्च २०२१ पासून आत्तापर्यंत २१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. हे कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ, रायगड, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, धुळे या विभागातील एसटी कर्मचारी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा