30 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेष‘भूपेश बघेल यांनी दुबईतील व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले’!

‘भूपेश बघेल यांनी दुबईतील व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले’!

महादेव ऍपच्या आरोपीचा खळबळजनक दावा

Google News Follow

Related

‘छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्याला दुबईमध्ये जुगाराचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते,’ असा खळबळजनक दावा महादेव बेटिंग ऍप प्रकरणातील मुख्य आरोपी याने व्हिडीओ मेसेज करून केला आहे. हा आरोपी त्याच्या सहकाऱ्यांना भिलाई येथे अटक झाल्यानंतर बघेल यांच्याकडे मदतीसाठी गेला होता, तेव्हा त्यांनी त्याला हे आश्वासन दिले होते, असे या आरोपीने सांगितले आहे.

याआधी ईडीने आरोपी शुभम सोनी याचा जबाबही नोंदवला होता. त्यात त्याने बघेल यांन यूएईस्थित महादेव ऍपकडून ५०८ कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला होता.मुख्यमंत्री बघेल यांचे राजकीय सल्लागार असलेले विनोद वर्मा यांनी ही भेट घडवून आणली होती, असा दावा शुभम सोनी यांनी केला आहे. तसेच, त्याने तो स्वतः महादेव ऍपचा मालक असून त्याने ही कंपनी २०२१मध्ये स्थापन केल्याचे सांगितले होते. तसेच, त्याच्याकडे या संदर्भात कागदपत्रेही असल्याचा दावा केला होता.

हे ही वाचा:

‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

‘मी या ऍपची सुरुवात सन २०२१मध्ये केली होती. माझा भिलाईतील जुगाराचा व्यवसाय चांगला चालत होता. माझा हा व्यवसाय छोट्या स्वरूपाचा होता. मात्र नंतर तो मोठा झाला. चांगले पैसे मिळू लागले. लोकांचे याकडे लक्ष गेले. जेव्हा माझ्या मित्रांना त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी मी विनोद वर्मा यांना प्रत्येक महिन्याला १०लाख रुपये देऊ लागलो,’ असे दावा शुभमने केला आहे. त्यानंतर शुभम दुबईला गेला. तिथे त्याने भिलाईतील दोन बांधकाम व्यावसायिकांना भागीदार केले.

त्याचा व्यवसाय दुबईमध्ये चांगला चालत असला तरी भिलाईमधील त्याच्या माणसांना अटका होत होत्या. त्यामुळे तो छत्तीसगढला आला आणि त्याने पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते बघेल यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी शुभमला बघेल यांना ५०८ कोटी रुपये देण्यास सांगितले.
‘मला प्रशांतजींनी जे करायला सांगितले. तसे मी केले. ५०८ कोट रुपयेही दिले. तरीही मला अडचणींचा सामना करावा लागतोय,’ असे शुभम याने या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
110,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा