मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात फरफटत आणण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले. मात्र काँग्रेस नेत्यांना राणाबद्दल प्रेम उफाळून आले अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. दहशतवाद्यावर राजकारण करण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, असा टोला निरुपम यांनी लगावला. आज (११ एप्रिल) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारताचा शत्रू तहव्वूर राणाबद्दल काँग्रेस नेत्यांना प्रेम उफाळून आले आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी राणाला भारतात आणण्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र चिदंबरम यांची ही कृती निंदनीय आहे, असे निरुपम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, २००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ११ नोव्हेंबर २०२९ रोजी तहव्वूर राणा आणि डेविड हेडलीविरोधात एनआयएने गुन्हा दाखला केला होता, मात्र २०११ मध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने या केसमध्ये राणाला सोडून दिले होते. मात्र त्यावर काँग्रेस सरकारने कोणताच विरोध केला नाही. २०१४ मध्ये यूपीए सरकार गेले आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवे सरकार आले आणि राणाच्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न झाले, असे निरुपम म्हणाले.
निरुपम पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दहशतवाद संपवायचा असेल तर एका आरोपीचे भारताकडे प्रत्यार्पण झाले असे आवाहन केले होते. त्यानंतर एनआयने पुन्ह हा खटला चालवला आणि राणाच्या प्रत्यार्पणाचा पाठपुरावा केला, ही मागणी अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आणि राणाला भारताच्या स्वाधीन केले. हे केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे श्रेय आहे, असे निरुपम म्हणाले.
हे ही वाचा :
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी खा खरबुज!
बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे १०२ जणांचा मृत्यू!
आयपीएलच्या इतिहासात रचला “विराट” विक्रम
विमानतळावर पोहोचताच मोदींनी प्रथम घेतली वाराणसी बलात्कार प्रकरणाची दखल
मुंबईत २६/११ चा हल्ला झाला त्यात शूर पोलीस हुतात्मा झाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. मात्र त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसकडून या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, अशा प्रकारचा अपप्रचार करण्यात आला होता. आज राणाच्या प्रत्यार्पणाचे श्रेय घेण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात भारतात ९७३९ दहशतवादी हल्ले झाले.
यूपीए सरकारच्या काळात दररोज देशभरात हल्ले होत होते, मात्र २०१४ पासून जम्मू काश्मिर वगळल्यास एकही मोठा दहशवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारने दहशतवाद्यांच्या मनात जबरदस्त जरब बसवली. देशातली अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याबरोबर सरकारने दहशतवादीविरोधी धोरणामुळे भारतीय सुरक्षित आहेत, असे निरुपम म्हणाले. दहशतवाद हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. काँग्रेसला त्यांच्या काळात जे काम करता आले नाही ते मोदी सरकारच्या काळात झाले. खरतर काँग्रेसवाल्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन करायला हवे, असे निरुपम म्हणाले.