33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषदोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली

दोनच दिवसांत मुंबईची मेट्रो तीनवेळा बंद पडली

Google News Follow

Related

सहा ते सात वर्षांनंतर मुंबईकरांसाठी मेट्रोच्या नवे दोन मार्ग सुरु झाले. मुंबईमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. एवढ्या वर्षाने सुरु झालेली ही मेट्रो मात्र दोनच दिवसांत तांत्रिक बिघाडामुळे सलग तीनवेळा बंद पडली आहे.

आज, ४ एप्रिल रोजी मुंबई मेट्रोच्या मागाठाणे ते आरे या मार्गावर मेट्रो बंद पडली होती. याबद्दलची माहिती मुंबई मेट्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, तांत्रिक कारणांमुळे मागाठणेकडून आरेकडे जाणारी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी दुसऱ्या मेट्रोची सोय करण्यात आली. असुविधेबद्दल क्षमस्व! असे ट्विट मेट्रोने केले होते.

मेट्रो सुरू होऊन दोनच दिवस झाले आणि लगेच तांत्रिक कारणांमुळे मेट्रो बंद पडली होती. मात्र, प्रवाशांनी सुद्धा मेट्रो बाबत तक्रार सुरु केली आहे. मेट्रोचे दरवाजे नीट उघडत नाहीत, अनेक प्रवाशांचा मेट्रो स्थानकांवर गोंधळ उडतोय.

हे ही वाचा:

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार

पुरोहितांना संरक्षण देण्याची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मेट्रोचा पहिला मार्ग घाटकोपर ते वर्सोवा हा सात वर्षांपूर्वी जुन २०१४ ला प्रवासी वाहतुकीकरिता सुरु झाला होता. त्यानंतर मुंबईत एकुण पाच मेट्रो मार्गांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू झाली होती. यापैकी ‘मेट्रो ७’आणि ‘मेट्रो २ अ’च्या सुमारे २० किलोमीटर मार्गावरची वाहतूक २ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा