30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषमेरठमधून पाकिस्तानी आयएसआय एजंटला एटीएसकडून अटक!

मेरठमधून पाकिस्तानी आयएसआय एजंटला एटीएसकडून अटक!

आरोपी मॉस्कोमधील भारतीय दूतावासात कार्यरत

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून एटीएसने आयएसआय एजंटला अटक केली आहे. सत्येंद्र सिवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.विशेष म्हणजे आरोपी सत्येंद्र हा २०२१ पासून रशियाची राजधानी मॉस्को येथील भारतीय दूतावासात काम करत आहेत.सत्येंद्र हा दूतावासात भारताचे सर्वोत्तम सुरक्षा सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र सिवालवर भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्करी आस्थापनांची महत्त्वाची गोपनीय माहिती आयएसआय हँडलर्सना दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

एटीएसच्या चौकशीत सत्येंद्रने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सत्येंद्र हा मूळचा हापूरचा आहे. एटीएसने त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले आहेत. वास्तविक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय हे परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवणे आणि हनी ट्रॅपिंग करत आहे, अशी माहिती यूपी एटीएसला मिळाली होती.

हे ही वाचा:

काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे दक्षिण भारताला झुकते माप, उत्तरेतील राज्ये मागे पडली

वादग्रस्त नाटकप्रकरणी पुणे विद्यापीठाकडून चौकशी समिती

बहुपत्नीत्वबंदी, लिव्ह इन रिलेशनशिप जाहीर करावे लागणार!

केरळ: कोझिकोड येथील युवा संमेलनात ‘भारत माता की जय’च्या घोषणेस नकार!

यूपी एटीएसने या माहितीच्या आधारे चौकशी केली असता, सत्येंद्र सिवाल यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला माहिती दिली व माहितीच्या बदल्यात त्याला पाकिस्तानकडून पैसेही मिळाल्याचे आढळून आले.भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून गोळा केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरचा रहिवासी असलेला सत्येंद्र सिवाल परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग, स्टाफ) या पदावर काम करत होता.तो सध्या रशियाची राजधानी मॉस्को येथे असलेल्या भारतीय दूतावासात कार्यरत होता.एटीएसने सत्येंद्र सिवाल याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा