भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असली तरी भारताची कारवाई सुरूच आहे. दोन्ही देशांच्या संघर्षादरम्यान भारताने कारवाई करत पाकिस्तानी खेळाडू, कलाकार यांच्यावर कारवाई करत त्यांच्या भारतातील ट्वीटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब अकाउंटवर बंदी घातली. पाकिस्तानी कलाकारांच्या गाण्यांवर आणि चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशातच संगीत अॅप्सनीही या कलाकारांवर कडक कारवाई केली आहे. भारत सरकारच्या निर्देशानंतर संगीत अॅप्स ‘स्पॉटीफाय’ने पाकिस्तानी गाणी काढून टाकली आहेत.
सरकारी सल्ल्यानुसार स्पॉटिफायवरून पाकिस्तानी गाणी काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे ‘मानद’, ‘झोल’, ‘फासले’ आणि इतर लोकप्रिय गाणी आता प्लॅटफॉर्मवर दिसणार नाहीयेत. ८ मे रोजी, भारत सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल मध्यस्थांना पाकिस्तानमधून येणारी वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर मीडिया सामग्री काढून टाकण्याचे निर्देश जारी केले होते.
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, २०२१ च्या भाग II अंतर्गत हा सल्ला जारी करण्यात आला होता. भारताच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते.
हे ही वाचा :
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’चा भाग बनलेल्या आशुतोष राणा यांचा अनुभव काय ?
जहाजांसाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान जाणून घ्या!
युवकांची गुणवत्ता पाहून श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास झाला खुश!
ट्रम्प यांनी ऍपलला भारतात उत्पादन करू नका असे का सांगितले?
दरम्यान, भारत-पाक युद्धबंदीनंतर दोनही देशांच्या बाजूने सध्या शांततेचे वातवरण आहे. एलओसीवर अद्याप कोणतीही गोळीबाराची घटना घडली नाही. मात्र, भारताची दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांनीमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सुरक्षा दलाकडून अजूनही शोध मोहीम सुरु आहे. तसेच मणिपूरमध्ये देखील चकमक झाली, ज्यामध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
