महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधीना टिकेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपच्या बाजूने फिक्स करण्यात आल्या होत्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधींच्या आरोपावर सत्ताधारी नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत टोला लगावला. राहुल गांधी हे नव्या प्रकारचे हवामानशास्त्रज्ञ असल्याचे मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, राहुल गांधी हे एक नवीन प्रकारचे हवामानशास्त्रज्ञ झाले आहेत, पराभवाचे हवामानशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या पराभवाची भविष्यवाणी केली आहे. जनता आज एनडीएसोबत आहे कारण आज प्रत्येक गावात रस्ते, वीज, आरोग्य आहे आणि सरकार प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. राहुल गांधींना माहिती आहे की जनता एनडीएसोबत आहे, म्हणूनच ते अशी भाषा बोलत आहेत. राजकीयदृष्ट्या, त्यांच्यात जीव नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅचफिक्सिंग’चा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी ‘Match-Fixing Maharashtra’ या शीर्षकाखाली Indian Express मध्ये एक op-ed (संपादकीय लेख) लिहून, तो एक्सवर शेअर केला. या लेखात त्यांनी “निवडणूक कशी चोरावी?” या नावाने भाजपवर निवडणूक प्रक्रियेच्या अपहरणाचा आरोप केला आहे.
हे ही वाचा :
मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या काळाची केली श्री श्री रविशंकर यांनी प्रशंसा
भारत-मंगोलिया सैन्यदलांचा दहशतवादविरोधी लष्करी सराव
राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून उत्तर
पहलगाम हल्ल्यात हुतात्मा जवानाच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ, मुस्लीम बाप-लेकाला अटक!
“२०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही फसवणुकीसाठीचा ब्लूप्रिंट (नकाशा) होत्या,”
“कारण महाराष्ट्रातील ‘मॅच फिक्सिंग’ बिहारमध्ये येणार आहे आणि नंतर कुठेही भाजप हरत असेल, तिथे ते येणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
