28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेषप्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ढासळली

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ढासळली

Related

महाराष्ट्राला गड किल्ले यांची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहेत. गड किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. नुकतेच समोर आले आहे की, रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ढासळू लागलेली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात या गड किल्ल्यांची कामगिरी ही अतिशय भरीव आणि मोलाची आहे. हे वैभव मात्र सध्याच्या घडीला अतिशय लाजिरवाण्या परिस्थितीमध्ये आहे.

नुकतीच बेलापूर किल्ल्यावरील बुरूज ढासळण्याचा प्रकारही समोर आला. आता रेवदंडा किल्ल्यावरील तटबंदी ढासळू लागलेली आहे. सद्यस्थितीमध्ये हा किल्ला आता अखेरच्या घटका मोजू लागलेला आहे. पाचशे वर्षांपूर्वी हा किल्ला पोर्तुगीजांच्या काळात बांधण्यात आला होता. पोर्तुगीजांनी बांधकाम करताना मुख्य प्रवेश दरवाज्यावर कोरलेले राजचिन्हही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इतकी ह्या किल्ल्याची दुर्दशा झालेली आहे. याबाबत स्थानिकांनी तसेच इतिहासप्रेमींनी आवाज उठवूनही प्रशासन मात्र ढिम्म आहे.

हे ही वाचा:

१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या

त्या भेटीचा अर्थ हाच की, पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय

उद्धव ठाकरेही आता ‘सामना’ वाचत नाहीत

प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी

सद्यस्थितीस महाराष्ट्रातील अनेक गड किल्ले मोडकळीस आले असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. शासनदरबारी असलेली उदासिनता किल्ले संवर्धनासाठी दिसून येत आहे. एरवी मराठी अस्मिता म्हणून गळे काढणारे महाराजांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी आता का पुढे येत नाहीत असाच सवाल आता इतिहासप्रेमींकडून विचारला जात आहे.

२२ जुलै १६८३ मध्ये रात्रीच्या सुमारास रेवदंड्यावर मराठ्यांनी हल्ला केला होता. परंतु पोर्तुगीजांनी फोंडा किल्ला येथे हल्ला केल्यावर मराठ्यांना हा किल्ला सोडावा लागला होता. त्यानंतर १७४० मध्ये तहाच्या माध्यमातून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. रेवदंडा हा किल्ला आगरकोट या नावाने देखील ओळखला जातो.

महाराष्ट्रातील बहुतांशी गड किल्ले ऐतिहासिक क्षणांचे आणि घटनांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे यांना जपणे हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा