हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक सांगली येथे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंच्यावर झालेल्या हिंसाचार विरोधात संतप्त निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने मंजूर झाला असताना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात निघालेल्या मोर्च्याच्या वेळी हिंदूंच्या घरावर हल्ले करून घर पेटवली जातात, मंदिरांच्या वर हल्ले करून मूर्त्या फोडल्या जातात, हिंदूंना पश्चिम बंगाल सोडून जा, अशा धमक्या दिल्या जातात व त्यांच्यावर सशस्त्र हल्ले करून त्यांना जखमी केले जाते. या सर्व गोष्टींना विधेयकाला विरोध करणारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुस्लिमांच्या मतासाठी पाठिंबा देत आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ६५० कुटुंबांना घर सोडून जायची वेळ आली आहे. केंद्र सरकारने या गोष्टीवर हस्तक्षेप करून ममता बॅनर्जी चे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. देशद्रोही दंगलखोरांना चिरडण्यासाठी लष्करी बाळाचा वापर करावा. राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने देशाच्या पंतप्रधानाकडे पश्चिम बंगालच्या हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी आग्रह धरावा. अशी मागणी ही करण्यात आली.
हे ही वाचा:
बंगालमधील मुर्शिदाबाद पु्न्हा पेटले !
अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोवरचा उद्रेक
कमर्शियल वाहनांची विक्री १० लाख युनिट्सपर्यंत पोहचेल
पुनर्वसन केंद्रात घडली धक्कादायक घटना
यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले की, आज जे पश्चिम बंगाल मध्ये घडते ते महाराष्ट्रामध्ये घडायला वेळ लागणार नाही. तरी हिंदूंनी या विरोधात ताकतीने रस्त्यावर उतरले पाहिजे.
यावेळी दत्ता भोकरे, मनोज साळुंखे, पैलवान प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, राजू जाधव, अवधूत जाधव, सोमनाथ घोडके, प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, यश पाटील, अभिमन्यू भोसले, शांताराम शिंदे, रवि वादवने, प्रथमेश शेटे, नारायण हांडे, अजयकुमार वाले बाळासाहेब बेलवलकर, सुभाष धमाल, प्रसाद रिसवडे, अरविंद यतनाळे, दिग्विजय शिंदे, शुभम गवळी, संतोष माळी इ. हिंदू एकताचे पदाधिकारी उपस्थित होते.