भारत-पाकिस्तान युद्ध जरी थांबले असले तरी अजूनही तणाव आहेच आणि याच दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरेतून एक मोठी माहिती समोर आली आहे. मथुराच्या राधाकुंड भागातील एका पंखा दुरुस्ती दुकानात ‘मेड इन पाकिस्तान’ पंखा मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संताच्या वेशात एक महिला पंखा दुरुस्त करण्यासाठी आली होती. दुकानदाराला पंख्यावर ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिलेले दिसताच पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि महिलेचा शोध सुरू आहे. स्थानिकांनी या भागात लपलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या उपस्थितीबद्दल भीती व्यक्त केली आहे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी केली. एसपी (ग्रामीण) सुरेश चंद्र रावत म्हणाले की, तपास सुरू आहे आणि लवकरच सत्य बाहेर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला साधूच्या वेशात पंखा घेऊन दुकानात आली होती. पंखा नीट काम करत नसल्याने तिने तो पंखा दुरुस्तीसाठी दिला. यावेळी दुकानदाराने पंख्याची तपासणी केली असता पंख्यावर Made in Pakistan” लिहिल्याचे दिसून आले. हे पाहून दुकानदारही चक्रावला. दुकानदाराने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली आणि सोशल मिडीयावर पंख्याचा फोटोही शेअर केला.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला. मात्र, पोलिसांना अद्याप त्या महिलेबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस आता पंखा आणणाऱ्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अनेक लोकांची चौकशीही सुरू केली आहे. हे प्रकरण मथुरेतील गोवर्धन पोलीस स्टेशन हद्दीतील राधाकुंड चौकीजवळील परिक्रमा मार्गाचे आहे.
हे ही वाचा :
श्रीकांत रविवारी फायनलमध्ये ली शि फेंगशी भिडणार
केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे एकत्र काम केले तर कोणतेही ध्येय अशक्य नाही!
IPL 2025: शेवटचा सामना, मनापासून जिंकायचंय
आयएसआयच्या संपर्कात असलेल्याला कच्छमधून ठोकल्या बेड्या
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की येथे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक लपून बसले आहेत. लोकांनी याबद्दल पोलिसांना अनेकदा माहिती दिली आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणी एसपी (ग्रामीण) सुरेश चंद्र रावत म्हणाले की, तपास सुरू आहे. तपासात काही गंभीर माहिती आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
