भारतीय संघातील शैलीदार फलंदाज शुभमन गिलवर निवड समिती कसोटी कर्णधार म्हणून विश्वास ठेवण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामान्यांसाठी शुभमन याच्या नावाचा विचार होऊ शकतो.
शुभमन गिलने भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित अगारकर यांची आधीच भेट घेतली आहे, जिथे त्याला कर्णधारपदाबाबत संकेत दिले गेले. अधिकृत घोषणा शनिवारी दुपारी होणार असल्याची शक्यता आहे. अशीही शक्यता आहे की गिल स्वतः अगारकरसोबत मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषदेला सामोरा जाईल. निवड बैठक सुमारे १२:४५ वाजता होणार असून पत्रकार परिषद १:३० वाजता आहे.
रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त आहे अशा स्थितीत शुभमन हा कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
भारताचा एकदिवसीय उपकर्णधार असलेल्या गिलला थेट कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याच्या कल्पनेशी सर्व तज्ज्ञ सहमत नाहीत. कारण अजून त्याची फलंदाजी पूर्णपणे बहरलेली नाही. मात्र निवड समिती गिलवर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विश्वास ठेवते. ऋषभ पंत उपकर्णधार होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अंडरट्रायल कैदी इम्रान खान प्रकरणी सशस्त्र दलाचे कॉन्स्टेबल निलंबित
पाकिस्तानविरोधात भारताला जर्मनीचा पाठींबा
मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात आता ‘ऑपरेशन सिंदूर’ ?
‘पाक’ विरघळला, आता मिठाईचा नवा ‘श्री’गणेशा
गिलच्या चौथ्या क्रमांकावर जाण्याने २३ वर्षीय साई सुदर्शनसाठी संघात स्थान उपलब्ध होऊ शकते. जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उपकर्णधार होता आणि त्याला थेट कर्णधारपद मिळायला हवे, पण त्याच्या फिटनेसमुळे त्याच्या नावावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही, पण भारताच्या कसोटी संघाच्या संक्रमण काळात त्याची भूमिका महत्त्वाची आहे.
नेतृत्वाच्या निर्णयाव्यतिरिक्त संघात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.
