स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त २४ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘मृत्युंजय सावरकर’ या एकपात्री नाटकाचे आयोजन करण्यात आले असून २५ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
शनिवार २४ मे रोजी मृत्युंजय सावरकर हे एकपात्री नाटक सायंकाळी ७ वाजता सादर केले जाणार असून त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजस्वी जीवनपट सादर केला जाणार आहे. या नाटकाचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक अनिल शेंडे असून ते सावरकरांवरील कवितांचे वाचनही करणार आहेत.या नाटकात भूमिका करणार आहेत अनिल पालकर.
हे ही वाचा:
शेअर बाजाराला मिळालेलं ‘गिफ्ट’ : आशीषकुमार चौहान
अदाणींना टार्गेट का करण्यात आले, त्याचा उलगडा होतोय..
महाकालेश्वर मंदिराजवळील बेगमबाग परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात
अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर आजपासून चढणार सोन्याचा मुलामा
रविवार २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांचे वितरण केले जाईल. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आहेत.
यावेळी लेफ्ट. कर्नल अनिल अर्स यांना शौर्य पुरस्कार, आयआयटीचे संचालक डॉ. मिलिंद अत्रे यांना विज्ञान पुरस्कार, सावरकर विचार प्रसारक डॉ. विजय सखाराम जोग तसेच वैद्य चिंतामण नारायण साठे याना स्मृतिचिन्ह पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
