32 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरविशेषसूर्य ग्रहण लागले....

सूर्य ग्रहण लागले….

देशभरात ग्रहणाची चर्चा

Google News Follow

Related

देश-विदेशात सूर्यग्रहण सुरू झाले हे आंशिक सूर्यग्रहण असेल आणि सूर्यास्तानंतर ग्रहण समाप्त होईल. हे सूर्यग्रहण भारतासह जगातील अनेक भागांमध्ये पाहता येणार आहे. आजचे ग्रहण भारतात सुमारे २ तास दिसणार आहे. देशात अमृतसरमध्ये संध्याकाळी ४.१९ वाजता ग्रहण पहिल्यांदा दिसले. त्याचवेळी मुंबईत संध्याकाळी ६.०९ पर्यंत सूर्यग्रहण दिसणार आहे. बहुतेक ठिकाणी सूर्यास्तानंतर ग्रहण संपेल. या वर्षातले हे शेवटचे सूर्य ग्रहण आहे पण त्याच बरोबर तब्बल २७ वर्षांनंतर दिवाळीत ग्रहण लागण्याचं योग्य आला आहे . महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ सूर्यग्रहण पालघरमध्ये दिसणार आहे.

भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी ४:२२ पासून सुरू झाले असून आणि ते संध्याकाळी ५:२६ पर्यंत दिसेल. अयोध्येत हे ग्रहण दुपारी ४:३८ पासून दिसणार असून  ५:२३ पर्यंत राहील. अमृतसर, श्रीनगर, जम्मू, वृंदावन, दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक भागात सूर्यग्रहण दिसत आहे. हे सूर्यग्रहण भारतात ३० टक्के, तर रशिया आणि चीनमध्ये ८० टक्के दृश्यमान असेल.आइसलँडमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी २.२९ पासून ग्रहण सुरू झाले आहे. रशियामध्ये संध्याकाळी ४.३० वाजता ग्रहण शिखरावर असेल आणि ६.३३ वाजता ग्रहण संपेल.

देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात हे सूर्यग्रहण सहज दिसणार आहे. हे ग्रहण देशाच्या पूर्वेकडील भागात दिसणार नाही, कारण त्यावेळी या भागात सूर्यास्त आधीच झालेला असेल. दुपारी ४ नंतर ग्रहण सुरू होईल. वेगवेगळ्या ठिकाणांनुसार ग्रहणाची वेळ वेगवेगळी असेल, दुपारी ४.५० पर्यंत बहुतांश शहरांमध्ये ग्रहण दिसेल. वर्षातील शेवटचे आंशिक सूर्यग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियाच्या काही देशांमध्येही दिसत आहे.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

गॉगल घालून घेतले दर्शन

सूर्य ग्रहण हे सध्या डोळयांनी बघितल्यास त्याचा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. २७ वर्षानंतर दिवाळीत आलेलं हे ग्रान बघण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. लोक गॉगल घालून ग्रहण दर्शनाचा आनंद घेत आहेत. काही ठिकाणी ग्रहण बघण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली आहे. इआकृतींच्या गच्चीयज ग्रान बघण्यासाठी लोक एकवटलेले बघायला मिळत आहे. खगोल अभ्यासकांसाठी हे ग्रहण पर्वणी ठरत आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी ग्रहण

मुंबईच्या जास्तीत जास्त ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला २४.३ टक्के व्यापेल. ग्रहणाचा कालावधी मुंबईत सुरुवातीपासून सूर्यास्तापर्यंत १ तास १९ मिनिटांचा असेल. पुण्यात ग्रहणाचा कालावधी सुरुवातीपासून सूर्यास्तापर्यंत १ तास १४ मिनिटांचा असेल.
मुंबई- प्रारंभ- ४.४९सूर्यास्त-६. ०९
पुणे- प्रारंभ- ४.५१ सूर्यास्त-६.०६
नाशिक- प्रारंभ-४.४७ सूर्यास्त-६. ०५
नागपूर- प्रारंभ-४.४९ सूर्यास्त-५.४२
कोल्हापूर- प्रारंभ-४.५७ सूर्यास्त-६.०६
औरंगाबाद- प्रारंभ-४.४९ सूर्यास्त-६.३०
सोलापूर- प्रारंभ-४.५६ सूर्यास्त-६.३०

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा