29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषपुण्यात येत आहे स्पुटनिक लस, केव्हा? वाचा...

पुण्यात येत आहे स्पुटनिक लस, केव्हा? वाचा…

Google News Follow

Related

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारकडून लसीकरण मोहिम राबवली जात आहे. स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरु झालं तर लसीकरण मोहिमेला आणखी वेग येईल. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन भारतात लवकरच सुरू होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपासून पुण्यात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या निर्मितीला सुरुवात करणात आहे.

देशात सध्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस नागरिकांना दिली जात आहे. तर स्पुटनिक व्ही लस खासगी रुग्णालयात दिली जात आहे. स्पुटनिक व्ही लसीला देशात मंजुरी मिळाल्यानंतर आता भारतात या लसीच्या उत्पादनालाही हिरवा कंदिल मिळाला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपासून स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करणार आहे.

भारतातील इतर काही उत्पादकदेखील स्पुटनिक व्ही लस तयार करण्यास तयार आहेत, असं रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी सांगितलं. एका अहवालानुसार, रशियाच्या स्पुटनिक व्हीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी दरवर्षी ३०० दशलक्ष डोस तयार करण्याचा करार केला आहे. सध्या, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील गामालेया सेंटरकडून सेल आणि वेक्टरचे नमुने प्राप्त झाले आहेत.

हे ही वाचा:

वाझेचा ‘नंबर वन’ अनिल देशमुखच!

नारायण राणेंची महत्वाच्या मंत्रिमंडळ समितीवर नियुक्ती

खडसेंसाठी महत्वाचा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ

पहिल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा कालवश

आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे एकूण ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ डोस देण्यात आले आहेत. यापैकी ३० कोटी ६६ लाख १२ हजार ७८१ लोकांना कोरोना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७ कोटी ४८ लाख ५४ हजार ८६५ लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा