शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांनी महाकुंभच्या मेळ्यातील संगम स्नानावरून गरळ ओकण्याचे काम केले आहे. हिंदू धर्म आणि परंपरे विरुद्ध बेताल वक्तव्य करून त्यांनी हिंदू परंपरेचा अपमान केला आहे. प्रयागराज महाकुंभ पर्वा मध्ये कोणीही जाऊ नका व प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे. सुनील राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपाने टीका केली आहे. काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून हिंदू समाजाची मत उद्धव ठाकरेंना मिळणे बंद झाली आहेत त्यामुळेच उबाठा गटात हिंदु धर्माचा अपमान करण्याची स्पर्धा दिसून येत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
शिवसेना उबाठा गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसळ महोत्सव २०२५’ मध्ये सुनील राऊत यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, प्रयागराजमध्ये दोन दिवस मजा करून मुंबई परतलो. तेथे कोणी, किती पाप धुतली ते पाहत होतो आणि पाप धुतलेली बघता-बघता मला असे वाटले कि ही पाप माझ्याचं अंगाला चिकटतील कि काय? म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही.
हे ही वाचा :
अमेरिकेतून आलेल्या स्थलांतरितांनी सांगितली ‘डंकी मार्गा’ची सुरवात ते शेवट!
“श्रीमान पंतप्रधान, तुम्ही महान आहात” म्हणत ट्रम्प यांच्याकडून मोदींना खास भेट!
ममता सरकारला उच्च न्यायालयाचा झटका, संघाच्या जनसभेला दिली परवानगी!
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे नेतृत्व आकाश शिंदेकडे
ते पुढे म्हणाले, आपलं बरे आहे. लोकांनी धुतलेली ती पापे आपल्या अंगाला चिकटण्यापेक्षा आपन स्वच्छ, निष्ठावंत, प्रामाणिक आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर असलेल्या निष्ठेवर कोठे काही गालबोट लागू नये. म्हणून मी तिथे प्रामाणिकपणे तिथे गेलो, पाहून आलो. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे तिकडे कोणी जाऊ नका, अजिबात जाऊ नका, काही नाही तिकडे, असे सुनील राऊत म्हणाले.
भाजपाने सुनील राऊत यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त करत टीका केली आहे. भाजपाने म्हटले, काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून हिंदू समाजाची मत उद्धव ठाकरेंना मिळणे बंद झाली आहेत त्यामुळेच उबाठा गटात हिंदु धर्माचा अपमान करण्याची स्पर्धा दिसून येत आहे. वारंवार हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचे काम करणाऱ्या उबाठा गटाला हिंदु समाज कधीही माफ करणार नाही.
निषेध…
विकृत संजय राऊतचा विकृत भाऊ तसेच उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत याने हिंदु धर्मात आणि परंपरेत अतिशय पवित्र असणाऱ्या प्रयागराज महाकुंभ पर्वा मध्ये कोणीही जाऊ नका व प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, असे बोलून… pic.twitter.com/cw8zTNa4et
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 14, 2025