महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ पंढरपूर येथे २३ आणि २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षक योजनेच्या (TMCAPY) खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. इरा जाधव (१२ वर्षाखालील मुली) हिने लांब उडीत सुवर्णपदक मिळवले. अनिरुद्ध नंबुद्री (१४ वर्षांखालील मुले) याने ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक आणि ८० मीटरमध्ये रौप्यपदक मिळवले.
ध्रुव शिरोडकर (१४ वर्षांखालील मुले) याने ३०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळवले. TMCAPY खेळाडूंनी २ सुवर्ण आणि २ रौप्य पदके जिंकली. ही सर्व मुले निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत.
हे ही वाचा:
दहशतवादी करणार होते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण
युक्रेन- रशियाच्या युद्धाची तीन वर्षे: अर्थव्यवस्थेवर काय झालाय परिणाम?
डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यात ममता बॅनर्जी उदासीन
भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील
आपल्या कामगिरीबद्दल अनिरुद्ध म्हणाला, ‘मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. आगामी स्पर्धेसाठी मी अधिक मेहनत घेईन. सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.’ अनिरुद्धने दोन्ही स्प्रिंटमध्ये वर्चस्व गाजवले. इराने तिचे पहिले राज्यस्तरीय पदक जिंकले. आरव, अर्चित आणि रिसा हे राज्यातील अव्वल ६ खेळाडूंमध्ये आहेत. दुर्वा, खुशी आणि युवा यांना त्यांच्या पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगला अनुभव आला. अशोक आहेर (सचिव – TDAA), राजेंद्र मयेकर (सहसचिव- TDAA) यांनी सर्व खेळाडूंचे आणि त्यांच्या संबंधित पालकांचे अभिनंदन केले आहे.
प्रणव देसाईची सोनेरी कामगिरी
याच योजनेतून खेळत असलेल्या प्रणव देसाईने पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप चेन्नई येथे १७ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. TMCAPY चा खेळाडू प्रणव देसाई याने १०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले.