32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषकोकणातून परतण्यासाठी फक्त पाच गाड्या?

कोकणातून परतण्यासाठी फक्त पाच गाड्या?

Google News Follow

Related

गणेशोत्सवासाठी यंदा मोठ्या संख्येने चाकरमान्यांनी कोकण गाठले होते. मंगळवारी पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर बुधवार, १५ सप्टेंबरपासून चाकरमानी पुन्हा मुंबईची वाट धरतील. मात्र, त्यांच्यासाठी फक्त पाचच गाड्या असल्याने त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कोकणातून परतणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने स्थानकांवर आणि रेल्वे गाडीत गर्दी होण्याची शक्यता आहे.

यंदा मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरून २६१ गणपती विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, पाच दिवसांच्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिवसभर गाड्यांची सेवा असणे अपेक्षित होते; मात्र फक्त पाचच गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

‘जेट’ पुढील वर्षी हवेत झेपावणार

मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि टाळेबंदीमुळे रेल्वे आणि एसटी सेवा पूर्णतः बंद होत्या त्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी जायला मिळाले नव्हते. यंदाच्या वर्षी कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यामुळे आणि निर्बंध शिथिल झाल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक गणपतीसाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडले होते. रेल्वेनेही कोकणसाठी २०० हून अधिक अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. एसटी महामंडळानेही दोन हजारांहून अधिक गाड्या सोडल्या आहेत. या सर्व गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले होते.

१५ सप्टेंबर रोजी सोडण्यात आलेल्या परतीच्या विशेष गाड्या

  • गाडी क्र. ०१२३२ सावंतवाडी- पनवेल
  • गाडी क्र. ०१२६० सावंतवाडी- पनवेल
  • गाडी क्र. ०१२६२ चिपळूण- पनवेल
  • गाडी क्र. ०१२२८ सावंतवाडी- सीएसएमटी
  • गाडी क्र. ०९४१७ कुडाळ- अहमदाबाद
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा