देशभरातील घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याविरुद्ध पोलिस शोधमोहीम राबवत कडक कारवाई करत आहेत. अशा घुसखोरांना पकडून त्यांना त्यांच्या देशात सोडण्याचे काम सुरु आहे. देशाच्या अनेक राज्यातून घुसखोरांना पकडण्यात आले आहे, येत आहे. अशा घुसखोरांविरुद्ध भाजपा, विविध हिंदू संघटना आवाज उठवत आहेत.
विशेष म्हणजे, पकडण्यात आलेले घुसखोर अनेक वर्षांपासून भारतात बेकादेशीरपणे राहत होते, त्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे देखील सापडली आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या शोध मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसानी कारवाई करत १८ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच बांगलादेशी ट्रान्सजेंडर आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील अशोक विहार परिसरातून ५ ट्रान्सजेंडरसह १८ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बंदी घातलेले IMO अॅप असलेले सात स्मार्ट मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत, जे बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी वापरले जात होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.
हे ही वाचा :
कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण, सुरक्षा रक्षकाला अटक!
कळते तिथे बात नाही तर लाथ; परराष्ट्र धोरणाची दोन लखलखती पाती…
भगवान जगन्नाथ निघाले त्यांच्या मावशीच्या घरी!
जेएनपीटी बंदरावर पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर जप्त!
दरम्यान, यापूर्वी १९ जून रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी जोडप्याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे जोडपे तब्बल १६ वर्षांपासून भारतात राहत होते. भारतात येवून त्यांनी एका मुलीला जन्मही दिला होता. त्यांनी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्टही बनवून घेतले होते.
दिलावर खान असे घुसखोर बांगलादेशीचे नाव असून तो आपल्यापत्नी आणि एक मुलीसह रायपूरमध्ये राहत होता. तो मजूर म्हणून काम करत असे आणि नंतर रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी करून अंडे आणि बिर्याणी विकत असे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत बांगलादेशी जोडप्याला अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरु आहे.
