28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामा१९ वर्षीय विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चौघांना अटक

१९ वर्षीय विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चौघांना अटक

Related

कुर्ला पूर्व नेहरू नगर मध्ये १९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
पीडित विवाहिता ही मूळची कोलकाता येथे राहणारी असून नातेवाईकासह ती मार्च महिन्यात मुंबईत आली होती.

पीडितेचा मेहुण्याने मार्च महिन्यात कुर्ला पूर्व बर्मा सेल परिसरात राहणाऱ्या तिघांकडून पैसे घेऊन पीडितेला त्यांच्या ताब्यात दिले. या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेच्या तीन महिन्यांनी पीडिता ही मंगळवारी नेहरू नगर पोलिस ठाण्यात आली व तिने तक्रार दाखल केली. नेहरू नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

हे ही वाचा:

‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’

अजित पवारांच्या भाषणावरून वाद

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याशेजारी सापडला अजगर; सर्पमित्रांनी वाचवले

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

 

दोन वर्षांपूर्वीही नेहरूनगर येथे अशीच एका ३३ वर्षीय महिलेवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर महिला लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघालेली असताना तिच्यासोबत एक इसम होता, नंतर त्याने तिला एकेठिकाणी सोडल्यावर तिथे असलेल्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. हे दोघेही अमली पदार्थांचे सेवन करणारे होते. नंतर आणखी दोघांनी त्या महिलेवर बलात्कार केला. या चौघांना नंतर अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा