28 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरक्राईमनामागव्हाच्या शेतात पिकवला अफू

गव्हाच्या शेतात पिकवला अफू

पुणे पोलिसांनि मुद्देमालासह केले दोन शेतकऱ्यांना अटक

Google News Follow

Related

पुण्याजवळील होळकरवाडी  इथे दोन शेतकऱ्यांना ११ लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालासह गव्हाच्या शेतात अफू पिकवल्यामुळे अटक केली आहे. आतापर्यंत आपण शेतामध्ये गांजाची लागवड केल्याची बातमी ऐकली होती पण, पुण्यातल्या होळकर वाडी इथल्या दोन शेतकऱ्यांनी चक्क त्यांच्या गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्यामुळे त्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. या  प्रकरणी  अटक केलेल्या  राजाराम दामोदर होळकर आणि बाळ किसान कटके अशी त्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

लोणी काळभोरच्या पोलिसांना ओढ्यालगत काही शेतकरी गव्हाच्या शेतात अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने अफूच्या पिकांची लागवड करत आहेत अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करत मुद्देमालासह ११ लाख ६० हजार  रुपयांचा  माल  जप्त करण्यात आला. होळकरवाडी  मधील चिमणी तलाव परिसरांत पोलिसांच्या विशेष पथकाला याठिकाणी अफूची लागवड झाल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत समोर आले आहे. त्यानंतरच्या कारवाई मध्ये पोलिसांनी हि अफूची शेती नष्ट करून ११६ किलोग्रॅम वजनाची अफूची चक्क एक हजार ३७४ झाडे ज्याची बाजारात किंमत ११ लाख ६० हजार रुपये आहे ती जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

सुप्यात देखील आढळली अफूची शेती
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील सुपे येथे  दोनच दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये  अफूची शेती करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाई मध्ये पोलिसांनी अफूची बोन्डे जप्त करून या  बोडांचे  एकूण वजन ३३ किलो २०० ग्राम असे आहे. प्रति किलो २००० रुपये दराने यां अफू पिकांची किंमत ४४ हजार ४०० रुपये इतकी आहे. मयूर उत्तम झेंडे या शेतकऱ्याच्या शेतात मक्याच्या पिकांऐवजी अफूची शेती केल्याचे पोलिसांना आढळले आहे. पोलिसांना या शेतीची माहिती मिळताच रात्रीपर्यंत पोलिसांनी शोध घेऊन पोलिसांनी तपास सुरु करून कारवाई केली. महाराष्ट्र राज्यात अफूची शेती बेकायदेशीर आहे. असे असूनसुद्धा शेतकरी आपल्या शेतात अमली पदार्थांची शेती करताना दिसतात. पोलिसांना याचा सुगावा लागला तर ते त्वरित कारवाई करतात कारण, पटकन पैसे मिळण्यासाठी शेतकरी असे अवैध कामे करतात. अफूंच नाही तर शेतकरी गांजाची लागवड करताना आढळले तर पोलिसांचे विशेष पथक त्यांच्यावर नजर ठेऊन असून त्यांच्यावर त्वरित कारवाई  करण्यात येते असे काळात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा