केरळमधील कोची येथून यावेळी मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरु केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान एकाने ‘आयएनएस विक्रांत’च्या स्थानाची चौकशी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. मुजीब रहमान असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान एकाने आयएनएस विक्रांतबद्दल माहिती मागितली होती. त्याची ओळख मुजीब रहमान अशी झाली आहे. मुजीब रहमान नावाच्या या व्यक्तीने कोची नौदल मुख्यालयात फोन करून स्वतःची ओळख पीएमओचा अधिकारी म्हणून सांगितले. कॉलवर आयएनएस विक्रांतचे नेमके स्थान देण्याचे निर्देश देण्यात आले. तथापि, भारतीय नौदलाने कोणतीही गुप्तचर माहिती देण्यास नकार दिला आणि पोलिसांना माहिती दिली.
हे ही वाचा :
कपालभाती प्राणायाम : जाणून घ्या योग्य पद्धती कोणती ?
उडण्यापूर्वी भारताने ‘उडवले’ पाकिस्तानचे जेएफ-१७ लढाऊ विमान!
ही माहिती मिळताच पोलिस पथकही सक्रिय झाले आणि मुजीब रहमानला नवीन फौजदारी कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर, राज्य पोलिस, नौदल आणि आयबी त्याची चौकशी करत आहेत. आरोपी मुजीब रहमान हा मूळचा कोझीकोडच्या एलथूर भागातील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे आणि त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तथापि, पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सुरक्षा एजन्सीमध्ये एकाच खळबळ उडाली होती.
