27 C
Mumbai
Tuesday, November 29, 2022
घरक्राईमनामा...त्यांनी बॅगेत भरून दिल्या '४० लाखां'च्या खेळण्यातल्या नोटा

…त्यांनी बॅगेत भरून दिल्या ‘४० लाखां’च्या खेळण्यातल्या नोटा

पोलिसांनी केले त्रिकुटाला जेरबंद

Google News Follow

Related

आयकर छाप्यात जप्त केलेले नोटा अर्ध्या किंमतीत देतो असे सांगून व्यवसायिकांना गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या त्रिकुटाजवळून पोलिसानी महागड्या मोटारी आणि खेळण्यातल्या भारतीय चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहे.

देवराव भाऊराव हिवराळे (३५), रविकांत जर्नादन हिवराळे (३६) आणि योगेश वासुदेव हिवराळे (३२) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहे, हे तिघे बुलढाणा जिल्ह्यात राहणारे आहेत. पुण्यात राहणारे व्यवसायिक रामदास बल्लाळ यांना या तिघांनी आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे छाप्यात जप्त केलेले ४० लाख रुपये आहे, त्यांना ते अर्ध्या किंमतीत देत असल्याचे सांगत बल्लाळ यांना या तिघांनी मुंबईत बोलावून त्यांना आलिशान मोटारीमधून फिरवून तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीसाठी आणून ते खरोखर आयकर अधिकारी असल्याचे भासवून बल्लाळ यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर या तिघांनी बल्लाळ यांना दादर येथील प्रीतम हॉटेलमध्ये बोलावून ४० लाख रुपये असल्याची बॅग सोपवून त्या बदल्यात बल्लाळ याच्याकडून २० लाख रुपयांची बॅग घेऊन रफुचक्कर झाले.

हे ही वाचा:

कैलास मानसरोवर भारताचे आहे, ते भारताचेच असले पाहिजे

वेंगसरकर अकादमी आणि स्पोर्टसफिल्ड यांच्यात विजेतेपदासाठी लढत

मृत मुबिनने आत्मघाती स्फोट करण्यासाठी शरीरावरील सगळे केस काढले

तब्बल ४११ दिवसांनी कोरोनाग्रस्त झाला बरा!

 

रामदास बल्लाळ यांनी तिघे निघून गेल्यावर बॅगेतील नोटा तपासल्या असता बॅगेत ५०० रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटावर ‘भारतीय बच्चो की बँक’ असे लिहलेले दिसून आले.आपली फसवणूक झाल्याचे कळताच रामदास बल्लाळ यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली.

माटुंगा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, सहा. पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रशांत कांबळे, सहा. फौजदार जयेंद्र सुर्वे आणि पथक यांनी तपास करून तिघांना अटक करून त्यांच्या जवळून मर्सडीज बेंज, फॉरचुनर मोटार आणि क्रेटा कंपनीची कार अश्या एकूण तीन मोटारी आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेले तिघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यात या प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून यापूर्वी त्यांना अनेक वेळा अटक देखील झाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा