27 C
Mumbai
Monday, June 16, 2025
घरसंपादकीयआजा पाकिस्तानी, बाप काँग्रेसी, नाव अलीखान महमुदाबाद, धंदे समाजवादी

आजा पाकिस्तानी, बाप काँग्रेसी, नाव अलीखान महमुदाबाद, धंदे समाजवादी

... पण मोदींनी सत्तेत येऊन खेळ केला खराब

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूरबाबत फेसबुकवर हलकट टीपणी करणाऱा हरियाणातील अशोका युनिवर्सिटीचा प्राध्यापक अली खान महमुदाबाद याला अटक करण्यात आली. याची मुळं पाकिस्तानात आहेत. त्यामुळे त्याची पाठराखण करण्यासाठी काँग्रेस
नेते सरसावणे स्वाभाविकच नाही का? जिथे जिथे पाकिस्तानचा संबंध असतो तिथे ओणवे होण्यासाठी काँग्रेस नेते सज्जच असतात. काँग्रेस प्रवक्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत अकलेचे तारे तोडले. मोदी सरकारला धारेवर धरले.
अली खान आणि काँग्रेसमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. दोघांचा संबंध पाकिस्तानच्या निर्मितीशी आहे. दोघांचे पाकिस्तानवर उदंड प्रेम आहे. हे प्रेम खानदानी आहे. बापजाद्यांपासूनचे आहे.

कर्नल सोफीया कुरेशी यांचे हिंदुत्ववाद्यांनी केलेले कौतुक या अली खान महमुदाबादला का झोंबले, त्याने फेसबुकवर ती पोस्ट का केली. याची कारणे प्रदीर्घ आहे. त्यामागे इतिहास आहे. सोफीया कुरेशी यांचे कौतुक करणारे हिंदुत्ववादी मॉब लिंचिंग, बुलडोजर कारवाई आणि द्वेषाचे बळी ठरणाऱ्यांनाही त्याच नजरेतून पाहतील काय? असा कुत्सित सवाल त्यांनी फेसबुक पोस्टमधून केला. भारत- पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असताना मुस्लीमांचा बुद्धीभेद करण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली, असे मानायला वाव आहे. या पोस्ट मागे निश्चितपणे चांगला हेतू नाही. हा पाकिस्तानचा एजेंडा रेटण्याचा प्रकार आहे.
हरियाणा महिला आयोगाने या पोस्टची दखल घेत कारवाई केली. हरियाणा पोलिसांनी अली खानला अटक केली. त्याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. हा अली खान नेमका कोण आहे? हे लक्षात घेतले तर हिंदुत्ववाद्यांवर त्याचा असलेला रोष आपल्या चटकन लक्षात येऊ शकतो.

जिहादी मानसिकतेचा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक एवढीच त्याची ओळख नाही. त्याचा खानदानी इतिहास पाकिस्तानशी जोडलेला आहे. हा अली खान मुहमुदाबाद संस्थानाचा अखेरचा राजा मोहमद आमीर अहमद खान याचा नातू. हा राजा मुस्लीम लीगच्या स्थापनेपासून या पक्षाचा आधार स्तंभ होता. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी या खानदानाने जंग जंग पछाडले.
पैशाच्या राशी उभ्या केल्या. हा राजा मोहमद अली जिनाचा खंदा समर्थक आणि निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मोहमद आमीर अहमद खान काही काळ इराकमध्ये वास्तव्याला होता. १९५७ मध्ये त्याने पाकिस्तानचे
नागरीकत्व स्वीकारले. या कुटुंबाची अब्जावधी रुपयांची मालमत्ता लखनौ, लखीमपूर खेरी, बाराबांकी, सीतापूर, नैनीताल मध्ये होती. लखनौपमध्ये बटलर पॅलेस, महमुदाबाद मेन्शन, लॉरी बिल्डींग, कोर्ट अशा इमारती आहेत. मालमत्तेची
एकूण किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये असावी.

१९६५ च्या भारत-पाक युद्धात ही मालमत्ता जप्त करण्यात आली. १९६८ मध्ये एनिमी प्रॉपर्टी एक्ट अंतर्गत ही मालमत्ता सरकार जमा झाली. मोहमद आमीर अहमद खानच्या मृत्यूनंतर त्याची हिंदू पत्नी विजया खान आणि मुलगा सुलेमान
मोहमद आमीर मोहमद खान हे भारतात आले. त्यांनी भारताचे नागरीकत्व स्वीकारले. भारताबाबत प्रेम असल्यामुळे ते भारतात आले, असा काही विषय नाही. त्यांचा डोळा इथल्या अब्जावधीच्या मालमत्तेवर होता. ती मालमत्ता जी
भारत सरकारने जप्त केली होती. भारतात आल्यानंतर या माय-लेकांनी भारताचे नागरीकत्व स्वीकारले. त्यानंतर
जप्त केलेली मालमत्ता मिळवण्यासाठी सुलेमानने प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. त्याल यशही आले. २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही मालमत्ता त्याला बहाल केली. परंतु हा आनंद औट घटकेचा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे
सरकार सत्तेत असल्यामुळे पाक धार्जिण्यांना इथली मालमत्ता गिळता आली नाही.

हे ही वाचा:

पाकला लपण्यासाठी जागाही मिळणार नाही…ते आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात!

राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट

छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

“अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का नाही?”

२०१७ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १९६८ च्या एनिमी प्रॉपर्टी एक्टमध्ये सुधारणा केली. पाकिस्तानी नागरीक आणि त्यांच्या वारसांना सुद्धा त्यांची मालमत्ता मिळणार नाही, अशी तरतूद केली. २०२३ मध्ये या सुलेमानचा मृत्यू झाला. अली खान हा त्याचा मुलगा आहे. समाजवादी पक्षाचा प्रवक्ता आहे. ज्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी लढा दिला, हिंदूंवर वरवंटा चालवला. सढळ हस्ते रक्तपात केला. त्यांनी न्यायालयीन मार्गाने भारतातील मालमत्तेवर कब्जाही
मिळवला. कल्पना करा भारतात मोदींचे सरकार नसते तर काय झाले असते. अली खान महमुदाबादला अटक केल्यावर काँग्रेसचे नेते आकांड तांडव करतायत. त्यांना इतका कळवळा का आला आहे हे लक्षात घ्या. अली खानने आपल्या
फेसबुक पोस्टमध्ये काँग्रेसचे आवडते मॉब लिंचिंग, भाजपाचा कथित अल्पसंख्यांक द्वेष, बुलडोजर नीती आदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु विषय इथे संपत नाही.

कधी काळी मुस्लीम लीगशी संबंध असलेले हे खानदान जेव्हा मालमत्तेवर डोळा ठेवून भारतात आले. तेव्हा सुलेमान मोहमद आमीर मोहमद खानचे वय अवघे सात होते. हा पुढे काँग्रेसचा नेता बनला. दोन वेळा आमदार झाला. मुस्लीम लीगचा इतिहास पाठिशी असलेला हा परिवार काँग्रेसी झाला. उत्तर प्रदेशात काँग्रेस डळमळीत झाल्यानंतर सुलेमानचा मुलगा अली खान समाजवादी पार्टीच्या वळचणीला गेला. काँग्रेसचा वाचाळ प्रवक्ता पवन खेरा याने या अली खानच्या अटकेनंतर लगेचच त्याचे समर्थन केले आहे. अली खानच्या दोन चुका आहेत. एक तर त्याने भाजपाच्या सरकारविरुद्ध सत्य लिहिले, दुसरी चूक म्हणजे त्याचे नाव. अर्थात खेरा यांनी त्याच्या धर्माकडे अंगुलीनिर्देश केलेला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसची प्रचंड गोची झालेली आहे. देशात अशा प्रकारचे वातावरण आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करता येत नाही. कारण लोक त्यांच्या पाठीशी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या विरोधात काही बोलता येत नाही. हे ऑपरेशन अपयशी ठरले असे तोंडसुख घेता येत नाही. त्यामुळे अली खानसारखे पाक धार्जिणे काही बोलले की त्याचे समर्थन करणे एवढाच धंदा काँग्रेसकडे उरलेला आहे.

अली खान जे काही बोलला ते पाकिस्तानसाठी उपयुक्त आहे. काँग्रेसची भाषा काही वेगळी नसते. कधी काळी झालेल्या इकलाखच्या लिंचिंगबद्दल बोलणारे ना मुरादाबादच्या दंगलीवर बोलत ना, बांगलादेशात सुरू असेलेल्या हिंदूंच्या वंशविच्छेदाबाबत. काँग्रेस हा एक नीच मानसिकेता पक्ष आहे. या पक्षाचे नेते राहुल गांधी कायम हिंदू विरोधी, भारत विरोधी उपद्व्यापामध्ये गुंतलेले असतात. सतत भारत विरोधी बरळत असतात. त्यामुळे त्यांचे जे बगलबच्चे आहेत तेही तशीच भूमिका घेत असतात. पिसाळल्यागत बोलत असतात, पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करत असतात. अली खानला भाजपाबाबत द्वेष असणे स्वाभाविक आहे. याचा आजा पाकिस्तानी होता. बाप सुद्धा पाकिस्तानी. मालमत्तेच्या आशेने भारतात आला.
पाकिस्तानात राहिलो तर आपली अब्जावधीची मालमत्ता गमवावी लागणार.  भारतात आलो तर ती न्यायालयाच्या माध्यमातून मिळवता येईल असा त्याचा होरा होता. तो खराही ठरला. मालमत्ता मिळाली.

पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या, मोहमद अली जिनाचे समर्थन करणाऱ्या राजा मेहमुदाबादच्या मुलाला काँग्रेसने दोन वेळा आमदार बनवले. मोदींनी येऊन खेळ खराब केला. कायद्यात दुरुस्ती केली नसती तर पाकिस्तानी नागरीक असलेल्या धनदांडग्यांनी आपला एक वारस भारतात पाठवला असता. त्याने भारतीय नागरीकत्व स्वीकारून भारतातील मालमत्ताही ताब्यात घेतली असती. म्हणजे निष्ठा पाकिस्तानकडे आणि मालमत्ता भारतात, असा प्रकार झाला असता.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा